Yash confirms KGF 3: काही दिवसांपूर्वीच साउथ सुपरस्टार यशने जाहीर केले होते की तो नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटात काम करत आहे . या चित्रपटात यश रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे . या चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे यशच्या चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, यशने चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यशने 'KGF 3' चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यश 'KGF 3' या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


'KGF 3' चित्रपटाबाबत काय म्हणाला यश


नुकतीच यशने 'KGF 3' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली आहे. सध्या यश 'रामायण' आणि 'टॉक्सिक' सारख्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटांसोबतच तो 'KGF 3' चित्रपटावर देखील काम करणार आहे. तो म्हणाला की, मी तुम्हाला वचन देतो की, आम्ही वेळोवेळी 'KGF 3' चित्रपटाबद्दल बोलत राहू. सध्या 'KGF 3'च्या कथेवर काम सुरू आहे. आम्हाला कल्पना आहे की, योग्य वेळ येताच आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देऊ. मी एवढेच म्हणेन की आता आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करावे लागेल. हा चित्रपट जबरदस्त असणार आहे. 



'KGF' च्या दोन्ही भागांचा बॉक्स ऑफिसवर धमाका


यशच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चाहत्यांनी आतापासूनच आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 'KGF' च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धमाका केला आहे. हे आता सर्वांनाच माहीत आहे. यशचा 'KGF' हा चित्रपट अजूनही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. यामुळेच निर्माते 'KGF 3' वर काम करत आहेत. आता यशनेही 'KGF 3' च्या कथेवर काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आता 'KGF 3' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.