अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत.
Actress Aishwarya Rai Abhishek Bachchan and Aaradhya: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानीच्या लग्नात वेगळे आगमन झाल्यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याची अफवा पसरू लागली होती. मात्र, अशातच आता अनंत-राधिकाच्या लग्नातील डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. ज्यामध्ये अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं दाखवली आहेत.
अनंत-राधिकाच्या या डॉक्युमेंटरीमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसत आहेत. त्यासोबतच त्यांनी मॅचिंग कपडे देखील परिधान केली आहेत. त्यासोबतच आराध्या डान्स परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसत आहे. हा तिघांचा आनंदाचा क्षण अनंत-राधिकाच्या डॉक्युमेंटरीमध्ये ठळकपणे दिसत आहेत. जो सोशल मीडियावरील अफवांच्या वादावर सर्व काही ठीक आहे असं दाखवत आहे.
अनंत-राधिकाचा लग्न सोहळा जिओ सिनेमावर पाहा
देशातील सर्वात श्रीमंत विवाहांपैकी एक असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची अनेक महिने सोशल मीडियावर चर्चा होती. जामनगरमधील प्री-वेडिंग कार्यक्रमापासून सुरुवात झाली आणि मुंबईतील रिसेप्शनपर्यंत सुरू राहिली. यामध्ये परदेशातही भव्य पार्टी झाली.
दरम्यान, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलाचे लग्न आता जगाला पाहता येणार आहे. लग्नाच्या माहितीपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये नीता अंबानी अनंत-राधिकाच्या लग्नातील गुंता समजावून सांगताना दिसत आहेत. तर बॉलिवूड कलाकारही मोठ्या उत्साहात दोघांना ओवाळताना दिसत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नावर तयार करण्यात आलेली ही डॉक्युमेंटरी तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. त्याचबरोबर युट्यूबवर देखील तुन्ही ट्रेलर पाहू शकता.
अनंत-राधिकाच्या डॉक्युमेंटरीमध्ये कोण-कोण?
वैली ऑफ गॉड्समध्ये अभिनेता अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन खूप आनंदात दिसत आहेत. मात्र, सोशल मीडियावर या दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती. पण ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या या हसण्यानं सगळ्यांनाच थक्क केलं आहे. कारण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये राणी मुखर्जी, करिश्मा कपूरसह अनेक सेलिब्रिटी आरती करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या लग्नात सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह सर्व मोठ्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहेत.