Aishwarya Rai Bachchan : विश्वसुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनला सौंदर्यासोबत अभिनयाने देखील ओळखले जाते. अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट केले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'मोहब्बतें', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'जोश' अशा अनेक चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. ज्यावेळी ऐश्वर्याने पडद्यावर प्रवेश केला तेव्हा सर्व प्रेक्षक थक्क झाले होते. अभिनेत्रीने सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार तसेच इतर कलाकारांसोबत काम केलं आहे. 


25 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार 


सुभाष घई यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'ताल' हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मुक्ता आर्ट्स लिमिटेड आणि मुक्ता आर्ट्स 2 जी सिनेमा आणि पीव्हीआर यांनी 'ताल' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 



13 ऑगस्ट 2024 रोजी या चित्रपटाने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या रायचा 'ताल' हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी सर्व देशभर प्रदर्शित होणार आहे.


काय आहे चित्रपटाची कथा?


1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'ताल' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. हा चित्रपट 11.50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटाने 22 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. ऐश्वर्या रायचा 'ताल' हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा चित्रपट आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत रोमान्स केला आहे. 


चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह


अभिनेत्री ऐश्वर्या रायचा 'ताल' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्यामुळे ऐश्वर्याचे चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत. 'ताल' हा चित्रपट 25 वर्षांपूर्वीचा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरला होता. आता तो पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते हा चित्रपट पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे म्हणत आहेत.