Alia Bhatt First Look Heart Of Stone: आलिया भट्ट (Alia Bhatt Pregnancy) लवकरच आई होणार आहे. या वर्षी जूनमध्ये आलिया आणि रणबीरनं आपल्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरूवात केली आहे. आलिया - रणबीरचा ब्रम्हास्त्र (Alia and Ranbir's Bramhastra) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाने आत्तापर्यंत अनेक उत्तोमोत्तम हिंदी चित्रपट केले आहेत आता आलियाची एक नवीन इनिंग सुरू झाली आहे. आणि ती म्हणजे आलिया आपल्या पहिल्या वहिल्या हॉलीवूड चित्रपटातून (Alia Bhatt First Hollywood Movie) प्रेक्षकांसमोर दिसणार आहे. ज्याचं नाव आहे हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone). या चित्रपटात आलियाचीही प्रमुख भुमिका आहे. 


आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?


या चित्रपटाचा नुकताच एक टीझर (Heart of Stone) प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये आलियाचा हटके लुक (Alia Bhatt First Look) प्रेक्षकांसमोर आला आहे. या समोर आलेल्या टीझरमध्ये मात्र आलिया खूपच घाबरलेली दिसते आहे. त्यामुळे तिची भुमिका नक्की कशी असेल काय असेल याची उत्तर लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर म्हणजेच नेटफ्लिक्सवर (Netfilx) प्रदर्शित झाला आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर येणार आहे. 


नेटफ्लिक्सने हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटांची लाइनअप जाहीर केली आणि हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लूक टीझरही रिलीज झाला. आलिया भट्टने ट्विटरवर (Alia Bhatt Twitter) टीझर सर्वांसोबत शेअर केला. हा एक अॅक्शन-पॅक टीझर आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढू लागली आहे. 


आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलिया इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रेग्नंन्सीनंतर एसएस राजामौलीचा (S. S. Rajamouli) पुढील चित्रपट करणार आहे. ज्यामध्ये महेश बाबू (Mahesh Bahu) मुख्य भूमिकेत आहेत. पण याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.