किंमत फक्त 4.99 लाख, सेफ्टी जबरदस्त; 6 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' फॅमिली कार

कारने विक्रीमध्ये एका नवा रेकॉर्ड केला आहे. फक्त 4.99 लाखांच्या कारच्या 6 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.   

| Nov 25, 2024, 17:54 PM IST

कारने विक्रीमध्ये एका नवा रेकॉर्ड केला आहे. फक्त 4.99 लाखांच्या कारच्या 6 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. 

 

1/10

भारतीय मार्केटमध्ये नेहमीच छोट्या आणि एंट्री लेव्हलच्या कारना मागणी असते. कमी किंमत, चांगला मालयेज आणि कमी मेंटेनन्स यामुळे या कारना फार पसंती मिळते.   

2/10

अशाच एका कारने विक्रीमध्ये एका नवा रेकॉर्ड केला आहे. फक्त 4.99 लाखांच्या कारच्या 6 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.   

3/10

आपण येथे टाटा टिएगो बद्दल बोलत आहोत. कंपनीने एप्रिल 2016 मध्ये पहिल्यांदा कारला घरगुती मार्केटमध्ये लाँच केलं होतं.   

4/10

आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कारपैकी ही एक आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती.   

5/10

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स (SIAM) डेटानुसार, ऑक्टोबरपर्यंत या कारच्या 5,96,661 युनिट्सची विक्री झाली होती.   

6/10

सरासरीनुसार, कंपनी प्रत्येक महिन्याला 4500 युनिट्सची विक्री करते. यानुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 6 लाख युनिट्सची विक्री होईल.   

7/10

Tata Tiago आपल्या मिड-साइट हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती वॅगनआर आणि स्विफ्टनंतर तिसरी सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे.   

8/10

एकूण 6 व्हेरियंटमध्ये असणाऱ्या या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 86 PS ची पॉवर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट करतं.   

9/10

या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी आहे.   

10/10

याचं पेट्रोल व्हेरियंट 16 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26 किमी/किग्रॅ  मायलेज देतं.