मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर आणि मौनी रॉय हेही तिथे आहेत. या सिनेमाच्या सेटवर ती वाढदिवस साजरा करणार आहे. जगभरातील तिचे चाहतेही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत. अशात तिने स्वत:लाही जरा हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


 फोटो शेअर


आलियाने तिच्या लवकरच रिलीज होणा-या ‘राजी’ सिनेमाच्या २५व्या दिवसाच्या शूटिंगचा फोटो शेअर केलाय आणि हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, सिनेमे माझ्यासाठी केवळ जगण्याचं साधन नाहीये तर मी सिनेमात करत असल्याने मला जीवन जगत असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी माझ्या २५व्या वाढदिवशी ‘राजी’ सिनेमाच्या २५व्या दिवसाच्या शूटचे दोन फोटो निवडले आहेत. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही २५ दिवसांनी म्हणजेच ९ एप्रिलला रिलीज होणार आहे’.



फिल्मसेटवर होणार सेलिब्रेशन  


एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, आलिया तिचा सहकलाकार रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आलियाच्या बर्थडे ला महेश भट्ट, सोनी राजदान आणि तिची बहीण बुल्गारियाला पोहचणार आहे.


करण जोहर सेलिब्रेशनमध्ये नाही.  


करण जोहरची आई हीरु यांचा ७५ वा वाढदिवस १८ मार्चला असल्याने करण जोहरचाही बुल्गारियाचा प्लॅन रद्द होणार आहे.


'तसा नवरा नको'


आलियाच टोपण नाव आलू आहे. ती आपल्या घरामध्ये सर्वांची लाडकी आहे. तिचे वडिल महेश भट्ट प्रसिद्ध सिनेनिर्माता तर आई सोनी राजदान अभिनेत्री आहे. 


वडिल महेश भट्ट यांच्यासारख्या पुरूषासोबत लग्न कराला मला कधीच आवडणार नाही असे आलियाने अनुपम खेरच्या चॅट शोमध्ये म्हटले होते.