मुंबई : 'मेरे साई' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनीविषयी चिंताजनक बातमी समोर आली आहे. शूटिंग करत असताना अनायाची अचानक प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनायाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना तिच्या प्रकृतिविषयी अपडेट देण्यात येत आहे. 


आणखी वाचा : वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून बसेल धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनायाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत तिच्या प्रकृतिची अपडेट देण्यात येत आहे. अनायाची प्रकृती किडणी खराब झाल्यामुळे बिघडली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीची किडनी खराब झाली आहे, त्यामुळे ती सध्या डायलिसिसवर आहे. 'आज तक'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, 'अनायाच्या वडिलांनीही सांगितले की तिची आर्थिक स्थितीही चांगली नाही. अनायावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मुलीच्या किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनयाच्या वडिलांना सतावत आहे'. (actress anaya sonis condition is critical kidney failure no money for dialysis treatment) 


आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत



आणखी वाचा : 'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ


दरम्यान, 2015 पासून ती फक्त एकाच किडनीवर जगत असल्याचेही समोर आले. काही वर्षांपूर्वी अनायाच्या दोन्ही किडनी या निकामी झाल्या होत्या तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दान केली होती. मात्र, आता अनायाची एक किडनीही निकामी झाली आहे. त्यामुळे आता अनायाला किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे.