Actress Eve Teasing Experience : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनीता हसनंदानी रेड्डी ही चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या अभिनय कौशल्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनीता ही 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून घरा-घरात पोहोचली. अनीतानं एक नकारात्मक भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेनं तिनं सगळ्या प्रेक्षकांच्या मनात जनू काही छाप सोडली. दरम्यान, अनीतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला शाळेत असताना आलेल्या एका भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनीता हसनंदानी ही मुलाखत 'हाउटरफ्लाई' ला दिली होती. या मुलाखतीत अनीतानं सांगितलं की 'जेव्हा आम्ही शाळेत जायचो, तेव्हा आई नेहमीच रिक्षानं जाण्यासाठी 10 रुपये द्यायची. पण ते पैसे आम्ही वाचवायचो आणि येताना पायी चालत यायचो. त्यापैशांनी आम्ही कॅन्टीनमध्ये समोसा किंवा दुसरं काही खायचो. जेव्हा आम्ही यायचो तेव्हा रिक्षावाला त्याची पँट खाली करुन उभा राहायचा. त्यानंतर तो त्याच्या खालच्या अंगाला (गुप्तांगाला) विचित्र पद्धतीने स्पर्श करायचा आणि घाणेरड्या नजरेनं आम्हाला निरखून पाहायचा.'



पुढे अनीतानं याविषयी सांगितलं की 'या सगळ्यामुळे तिनं तिचा येण्या जाण्याचा रस्ता बदलला. पण तरी देखील तिला भीती असायची की तो तिचा पाठलाग देखील करु शकतो. तर अनीतानं पुढे सांगितलं की ती मुलींच्या शाळेत शिकायची. त्याला तिथला रस्ता माहित होता आणि त्याच्याजवळ रिक्षा देखील होती, त्यामुळे जेव्हा केव्हा शाळेच्या आसपास कोणती रिक्षा यायची तर आम्ही घाबरायचो.'


हेही वाचा : 'कंबरला नुसता झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा...'; प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चा टीझर प्रदर्शित


अनीता हसनंदानीनं 'ये है मोहब्बतें' या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांच्यासोबतच्या तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तर अनीता प्रेग्नंसीनंतर जवळपास 5 वर्ष कॅमेऱ्यापासून दूर राहिली आणि आता ती 'सुमन इंदौरी' या शोमधून छोट्या पडद्यावर कमबॅक करते. या शोमध्ये श्वेता गौतम, जैन इमाम आणि अशनूर कौर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, अनीता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.