मुंबई : कोणत्याही लग्नसोहळ्यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा समारंभ असतो ते म्हणजे रिसेप्शन, किंवा स्वागतसोहळा. डान्स, सुंदर मेजवानी, जबरदस्त कपडे आणि पाहुण्यांची गर्दी असं एकंदर या रिसेप्शन सोहळ्याचं चित्र असतं. सध्याही काही सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत असल्यामुळं त्यांच्या रिसेप्शनवर चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिसेप्शनसाठी कोणत्या सेलिब्रिटींची हजेरी असणार इथपासून रिसेप्शनसाठी आपल्या आवडीचे कलाकार कोणत्या लूकला प्राधान्य देणार असे कैक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहेत.


उत्साहाच्या याच वातावरणात आता मात्र एक काहीशी निराश करणारी बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे विकीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रद्द झाल्याची.


लग्न इतक्या थाटामाटात पार पाडलं, आता रिसेप्शन रद्द का? विकी – कतरिनानं हा निर्णय़ का घेतला हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?


तर, रद्द करण्यात आलेला रिसेप्शन सोहळा विकी आणि कतरिनाचा नसून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचा आहे.



लग्नानंतर लगेचच अंकिता लोखंडेनं ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. पण, मुंबईत वाढता कोरोना पाहता हा रिसेप्शन सोहळा रद्द करण्याचा निर्णय़ या जोडीनं घेतला आहे.


माध्यमांसाठीसुद्धा या जोडीनं रेड कार्पेट इवेंट ठेवला होता. पण, आता तोसुद्धा होणार नाही. सध्या सेलिब्रिटी वर्तुळात अनेकांनाच कोविडची लागण झाल्याचं कळत आहे. ज्यामुळं अंकिता आणि विकी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.


रिसेप्शनचा भव्य सोहळा रद्द झाला असला तरीही, पार्टी मात्र होणार आहे.


लग्नाच्या निमित्तानं होणाऱ्या या पार्टीला येणारे पाहुणे रोटेशन पद्धतीनं ये-जा करतील. ज्यामुळं कोरोना नियमांचं उल्लंघन होणं किमान टळेल याचीच काळजी अंकिता आणि विकीकडून घेतली जात आहे.