Apurva Nemlekar Emotional Post on Brother's Death: बहिण-भावाचं नातं हे जगावेगळे असते. आपल्या बहीणीसाठी भाऊ आणि आपल्या भावासाठी बहीण ही कायमच झटत असते. आपल्यालाही अशा अनेक लोकप्रिय बहीण भावाच्या नात्यांबद्दल ठाऊक आहेच. सोबतच चित्रपट माध्यमातूनही आपल्यासमोर असेच आगळेवेगळे भावाचे नाते समोर आले आहे. भावंडं ही लहानपणापासून आपल्या परिचयाची असतात. त्यांच्यासोबतच आपण एकत्र वाढलो आणि खेळलो असतो सोबतच भांडलोही असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत असणारं आपलं नातं हे फारच जगावेगळं असतं. परंतु हे नातं तुटलं तर मात्र आपल्या आयुष्यात आलेली पोकळी भरून काढता येत नाही. आज आम्ही अशाच एका भावा-बहीणीच्या नात्याबद्दल बोलणारं आहोत. जिनं आपला भाऊ गमवला आहे तरीही त्याच्या आठवणीत ती स्वत:ला बळ देते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवंताच्या भुमिकेनं अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर ही चांगलीच लोकप्रिय झाली होती. तिच्या चाहतावर्गात चांगलीच भर झाली होती. आजही तिच्या या भुमिकेची चांगलीच चर्चा होताना दिसते. दोन महिन्यांपुर्वी तिनं आपला लाडका भाऊ गमावला परंतु आजही अपुर्वाला आपल्या भावाची आठवण आल्याशिवाय राहत नाहीये. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यातून तिनं आपल्या भावाबद्दल खास शब्द लिहिले आहेत. एप्रिल महिन्यात अपुर्वा नेमळेकरचा भाऊ ओमकार नेमळेकर याचे आकस्मिक निधन झाले आण तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या भावाच्या निधनाची माहिती तिनं इन्टाग्रामवरून दिली होती. आता ओमकारला जाऊन दोन महिने पुर्ण झाले आहेत. अपुर्वानं यानिमित्त आपली एक भावुक पोस्ट इन्टाग्राम स्टोरीतून शेअर केली आहे. 


हेही वाचा - ''अजूनही आईचा हात पकडतेय'', मायलेक ऐश्वर्या - आराध्याचा Video पाहून चाहते भारावले


या पोस्टमध्ये तिनं लिहिलं आहे की, भाऊ दोन महिने झाले. अजूनही माझं मन दु:खी आहे. मी अजूनही त्या दु:खाच्या वाटेवरून जात आहे. (हे एक गाणं आहे) आजही तुझी सातत्यानं आठवणं येते आहे. यावेळी तिनं आपल्या भावाचा फोटो शेअर केला आहे आणि तिनं मार्टिन केझर्नीचे 'एन्डलेस रोड ऑफ ग्रीफ' हे गाणं बॅकराऊंडला लावलं आहे.



अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिनं आपला भाऊ ओमकारसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Photo : Apurva Nemlekar Instagram)


अपुर्वा नेमळेकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिनं अनेक मराठी मालिकांतून आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. काही वर्षांपुर्वी आलेली तिची 'आभास हा' ही मालिका प्रचंड गाजली होती. सोबतच त्यानंतरही तिनं आपल्या अभिनयाच्या करिअरला ब्रेक दिला होता. परंतु तिनं परत कमबॅक करत 'झी मराठी'वरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंताची भुमिका केली होती. तिची ही भुमिका प्रचंड गाजरली होती. या मालिकेचा तिसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचे तीनही भाग हे प्रचंड गाजले होते. मागील वर्षी ती 'बिग बॉस मराठी 4' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिझमध्ये ती रनर अप ठरली होती.