''अजूनही आईचा हात पकडतेय'', मायलेक ऐश्वर्या - आराध्याचा Video पाहून चाहते भारावले

Aishwarya Rai Spotted With Aradhaya Bachchan: ऐश्वर्या आपल्या लेकीसह अनेकदा स्पॉट होताना दिसते त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते. आता यावेळी ऐश्वर्या आपली लेक आराध्यासोबत पुन्हा स्पॉट झाली आहे. यावेळी त्यांचा व्हिडीओ पाहून चाहते अक्षरक्ष: भारावून गेले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 15, 2023, 03:27 PM IST
''अजूनही आईचा हात पकडतेय'', मायलेक ऐश्वर्या - आराध्याचा Video पाहून चाहते भारावले title=
June 15, 2023 | aradhaya bachchan and aishwarya rai bachchan got spotted at airport video goes viral (Photo: Viral Bhayani: Instagram)

Aishwarya Rai Spotted With Aradhaya Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. तिची कायमच चर्चा होताना दिसते. आपल्या लेकीसह ती अनेकदा स्पॉटही होताना दिसते. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही आपली लेक आराध्यासह स्पॉट झाली होती. त्यावेळी तिच्या लुकवरून ती फारच ट्रोल झाली आहे. सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे एअरपोर्टवर स्पॉट होताना दिसत आहेत. कतरिना आणि विकीही काही दिवसांपुर्वी एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्याचसोबत आता अभिषेक आणि ऐश्वर्याही आपल्या लेकीसह एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. यावेळी आराध्या आपल्या आईचा हात पकडून जाण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल तर तिचा हा सालसपणा पाहून नेटकरीही घायाळ झाले. 

यावेळी ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिघंही यावेळी चर्चेत आले आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे आराध्या आणि ऐश्वर्याची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. आराध्या आता 12 वर्षांची झाली आहे. ती यावेळी आपल्या आईचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिचा हा केविलवाणा प्रयत्न पाहून नेटकरी भारावले आहेत. तिला काहीच ट्रोलही करत आहेत. 

हेही वाचा - Video: नेपोटिझमवर उघडपणे बोलला होता 'हा' अभिनेता, त्याच्याच प्रेमात बीग बींची नात?

यावेळी काहींनी कमेंट केली की, एवढी मोठी झाली तरीसुद्धा आईचा हात पकडते. तर काहींनी कमेंट केली आहे की, आराध्या अजूनही किती लाजते. तर अनेकांनी त्यांच्या बॉन्डिंगचेही फार कौतुक केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुकही केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या या कायमच चर्चेत असतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. कान्स महोत्सवासाठीही त्या दोघी काही दिवसांपुर्वी एअरपोर्टवर स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळीही त्यांची चर्चा रंगली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपुर्वी जेव्हा त्या दोघी स्पॉट झाल्या होत्या तेव्हा ऐश्वर्या आणि आराध्याच्या हअरस्टाईलची खूपच चर्चा झाली होती. आता नेटकऱ्यांनी नवी हेअरस्टारईल? असं म्हणत ऐश्वर्याला टोमणा मारला आहे. त्यामुळे तिच्यावर सगळेच नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी त्याच्या या लुकचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. ऐश्वर्यानं यावेळी काळ्या रंगाचा जंपसूट घातला होता.