मुंबई : प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची चर्चा केवळ त्यांच्या व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यही चर्चेत होतं. आशा पारेख यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशा पारेख खऱ्या प्रेमाच्या शोधात आयुष्यभर अविवाहित राहिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा पारेख यांचं नाव एकेकाळी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होतं. त्यांच्या जोडीला राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र इत्यादी त्यांच्या काळातील सर्व बडे स्टार्स सोबत दिसले होते. असं म्हटलं जातं की, आशा पारेख त्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्रीपैकी एक होत्या ज्या चित्रपटात काम करण्यासाठी मोठी रक्कम घेत असत. 


मात्र, आता या प्रश्नाकडे येऊ या की, आशा पारेख यांनी आयुष्यभर लग्न का केलं नाही? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, आशा पारेख कुणालाच आवडत नव्हत्या असं नाही. आशा पारेख यांचं चित्रपट निर्माते नासिर हुसेन यांच्यावर प्रेम होतं असं म्हटलं जातं.


नासिर हे अभिनेता आमिर खानचे काका, प्रसिद्ध दिग्दर्शक मन्सूर खानचे वडील आणि इम्रान खानचे आजोबा होते. ज्यांनी आता अभिनय सोडला आहे. मात्र, आशा यांचं शेवटपर्यंत पुर्ण होऊ शकलं नाही.


असं म्हटलं जातं की आशा पारेख यांच्या बायोग्राफीमध्ये, अभिनेत्री नासिर साहबच्या कुटुंबाचा खूप आदर करत असे आणि त्यांना 'होमब्रेकर' असं लेबल लावायचं नव्हतं. हेच कारण होतं की नसीर किंवा आशा पारेख दोघांनाही इच्छा असूनही एकमेकांच्या जवळ येऊ शकले नाही. पण आज जेष्ठ अभिनेत्री आशा पारिथ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. 


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी बाल कलाकार म्हणून बेबी आशा पारेख या नावाने आपल्या करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एका स्टेज समारंभात त्यांचं नृत्य पाहिलं आणि वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना मा (1952) मध्ये घेतलं आणि नंतर बाप बेटी (1954) मध्ये त्यांनी पदार्पण केलं.