मुंबई : फिरणं. प्रवास करणं हा माझा आवडता छंद..., असे म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. मुळात जगण्याच्या या प्रवासात कधीतरी खराखुरा प्रवास करण्यात काहीच गैर नाही. याच प्रवासादरम्यान उसंत घेण्यासाठी म्हणून आपण अनेकदा हॉटेलांमध्ये राहण्याला पसंती देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवासी सुविधा पुरवणाऱ्या काही आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचीच पसंती सुट्टीनिमित्त बाहेर गेल्यावर तुमच्याआमच्यासारखे सर्वजण देताना दिसतात. (bhagyashree limaye )


गंमत म्हणजे तिथं, गेल्यावर हॉटेलची खोली पाहिल्यानंतर भारवल्याची जी प्रतिक्रिया समोर येते ती पाहण्याजोगी असते. किती हा मोठा रुम, किती हा मऊ बिछाना, हा पलंग किती मोठा... वाह... बाल्कनीही आहे इथं... असंच सतत आपण म्हणत सुटतो. 


काही दिवसांसाठी इथं आपला मुक्काम असणाऱ्या आनंदात असणारी हीच मंडळी हॉटेलमधून निघताना मात्र थोडा खोडकरपणा करतात. तिथं ठेवण्यात आलेले शॅम्पू, ब्रश, टूथपेस्ट, साबण या साऱ्यावर डल्ला मारत ते चक्क चोरण्याचं धाडस अनेकजण करतात. 


तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केलं आणि तिची ही कृती कॅमेऱ्यात कैदही झाली. आपल्याकडे कुणी पाहतंय का, याचा विचार करत तिनं पटापट हॉटेलच्या बाथरुममध्ये असणाऱ्या गोष्टी उचलल्या. 



किती हे धाडस.... असाच विचार करत तुम्ही करत असाल, तर तर विचारांना ब्रेक द्या. कारण, या अभिनेत्रीनं गंमत म्हणून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' असा 'सूर्यवंशम' चित्रपटाचा अतिशय गाजलेला डायलॉग वापरत तिनं हा रिल शेअर केला. 


भाग्यश्रीच्या या रिलला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळाले आहेत. काहींनी यावर तुफान कमेंट्स करत असं करण्याऱ्यांची फिरकीही घेतली आहे. 


तुम्हीही सहलीला गेल्यावर अशा एखाद्या हॉटेलवर राहिल्यास असं काही करता का?