महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं चमत्कारिक मंदिर! त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो चंद्र

महाराष्ट्रातील 900 वर्ष जुन मंदिर आजही संशोधकांना कोड्यात टाकत आहे. या मंदिराची रचना थक्क करणारी आहे.   

| Nov 14, 2024, 23:22 PM IST

Kolhapur Kopeshwar Mandir Khidrapur :  कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या जवळ असलेले कोपेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात  त्रिपुरारी पौर्णिमेला अद्भूत नजारा पहायला मिळतो. कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग असे चमत्कारिक दृष्य पहायला मिळते.  हे मंदिर स्थापत्य केलेचा अद्धभूत नमुना मनाले जाते. 108 खांबावर उभ्या असेलल्या या मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे.  वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास करुन या मंदिराची रचना करण्यात आली. 

1/9

 महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं चमत्कारिक मंदिर आहे. या मंदिराचे खास वैशिष्टय म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र येतो. वर्षताून एकदाच हा नजारा पहायला मिळतो. 

2/9

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो.   

3/9

कोल्हापुरातील या अत्यंत प्राचीन मंदिराचे स्थापत्य विश्व प्रसिद्ध आहे. या मंदिराचे  स्थापत्यशास्त्र आणि भव्यता थक्क करणारी आहे.

4/9

 मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.  

5/9

स्वर्ग मंडप  हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. हा स्वर्ग मंडप 48  खाबांवर उभा आहे. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना आहे. हा संपूर्ण मंडप विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा थक्क करणारा नमुना आहे.   

6/9

108 खांब असेलल्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.  मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे. 108 खांब चार भागात विभागले गेले आहेत. 

7/9

12 व्या शतकात म्हणजेच 1909 ते 1178 या काळात  'शिलाहार' राजवटीत हे मंदिर बांधले गेले आहे. 

8/9

कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये असलेले कोपेश्वर मंदिर 900 वर्ष जुनं आहे. या मंदिरात तब्बल 108 खांब आहे. 

9/9

 कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या अगदी जवळ आहे हे कोपेश्वर मंदिर आहे.