Bhumi Pednekar Carpet Skirt: प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या हॉट लूकमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत  असते. भूमी ग्लॅमरस लूकसोबत बोल्ड लुकने देखील खूप चर्चेत असते. नुकतीच ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. जिथे तिच्या हटके फॅशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या या कार्यक्रमातील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जणांना तिचा हा लूक आवडता आहे. मात्र, काही जणांना तिचा हा लूक आवडला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमी पेडणेकरचा कार्पेट स्कर्ट लूक


अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती हिरव्या रंगाच्या फूल स्लीव्ह टॉपमध्ये दिसत आहे. यासोबत भूमी पेडणेकरने निळ्या रंगाचा कार्पेट स्टाइल स्कर्ट परिधान केला होता. यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती. तसेच तिने लिपस्टिक आणि विंग आयलायनरने तिचा लूक पूर्ण केला होता. याचबरोबर तिने हाय हील्स देखील परिधान केल्या होत्या. अभिनेत्रीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. चाहते तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 



तर काही जण तिच्या या लूकला ट्रोल देखील करत आहेत. एका चाहत्याने तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे की, जर काही सापडले नाही तर ती फक्त बेडशीट घालून आली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, मला तिचा पोशाख आवडला नाही. तर तिसऱ्या म्हणतो की, जोडीदार गुंडाळून आला आहे का? अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या तिच्या या फोटोंवर चाहते करत आहेत. तर काही लोक तिच्या या लूकचे कौतुक देखील करत आहेत. 


भूमी पेडणेकरचा शेवटचा चित्रपट


अभिनेत्री भूमी पेडणेकर ही शेवटची 'भक्षक' चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती 'द लेडी किलर' आणि 'थैंक यू फ़ॉर कमिंग'मध्येही दिसली होती. आता भूमी पेडणेकर लवकरच 'दलदल' आणि 'द रॉयल्स'मध्ये दिसणार आहे. सध्या तिच्या दोन्ही शोची शूटिंग सुरु आहे.