Actress Bipasha Basu Reveals her baby girl face: अभिनेत्री बिपाशा बासू हिनं काही महिन्यांपुर्वी सुंदर अशा मुलीला (Bipasha Basu Baby) जन्म दिला आहे. तिनं तिच्या बाळाचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केले होते परंतु मुलीचा चेहरा (Bipasha Basu Baby Face) दाखवला नव्हता. पण आता तिनं चाहत्यांसाठी आपल्या गोंडस मुलीचा चेहरा रिव्हिल केला आहे. देवी (Devi) असं बिपाशाच्या मुलीचं नावं आहे. सोशल मीडियावर बिपाशानं आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बिपाशानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''हॅलो वर्ल्ड, मी देवी आहे.'' सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. या फोटोमध्ये देवीनं सुंदर असा गुलाबी (Devi in Pink Dress) ड्रेस परिधान केला आहे. (Actress Bipasha Basu Reveals her baby girl face on instagram fans reacts to devis cute face entertainment news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर डोक्यावर तिनं मिनी बोचा गुलाबी हेअरबॅण्ड लावला आहे. या गोंडस ड्रेसमध्ये देवी खूपच सुंदर दिसते आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहून सुंदर असं स्मितहास्य करते आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये देवी आपल्या वडिलांसारखीच दिसते आहे अशी कमेंट केली आहे. देवीचा जन्म झाल्यानंतर बिपाशा बासू हिनं देवीचे अनेक व्हिडीओजही (Bipasha Basu Baby Devi Videos) शेअर केले होते, परंतु तिचा चेहरा लपवला होता. त्यामुळे बिपाशा आपल्या लेकीचा चेहरा तिच्या चाहत्यांना कधी दाखवणार याकडेच सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे अखेर काल 5 एप्रिलला चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. 


25 नोव्हेंबरला नुकत्याच जन्मलेल्या देवीचा फोटो बिपाशानं चाहत्यांना दाखवला होता. परंतु त्यातही तिनं इमोजी टाकून तिचा फोटो हलकेच लपवला होता. या फोटोमध्ये आपल्या लेकीकडे पाहत आनंदी दिसणारे आईवडिल बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर या फ्रेममध्ये (Bipasha Basu Delivery) दिसत आहेत. 


सध्या बॉलिवूडमध्येही अनेकांना आईवडिल होण्याचे वेध लागले आहेत. आपल्या छोट्या छोट्या पिल्लांचे फोटो आणि व्हिडीओ बॉलिवूडचे हे प्रॉऊड पेरेन्ट्स (Bollywood Parents) सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्यावर तूफान कमेंट्सही त्यांचे चाहते करताना दिसतात.


बिपाशा बासू ही आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. मध्यंतरी बिपाशानं बॉलिवूडच्या चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता आणि आपल्या संसारावर जास्त लक्ष केद्रिंत केले होते. करण सिंग ग्रोवरसोबत लग्न झाल्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही. मागच्या वर्षी तिच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगल्या होत्या. 2022 च्या 12 नोव्हेंबरला देवीचा जन्म झाला.



देवी (Bipasha Basu Pregnancy) आता चार महिन्यांची आहे. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू हिनं 2016 साली लग्न केले. करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover and Bipasha Basu Marriage) हा लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेता आहे.