मुंबई : खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे चर्चेत आलेली पाकिस्तानी अभिनेत्री रिदा इस्फहानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीनं अलीकडेच पाकिस्तानी कॉमेडियन नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. रिदा पहिल्यांदाच तिच्या लीक झालेल्या व्हिडिओवर बोलली. रिदा म्हणाली की तिचा साखरपुडा ज्याच्याशी झाला होता त्यानेच हा व्हिडीओ लीक केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर 2016 मध्ये अचानक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ पाकिस्तानी अभिनेत्री रिदाचा होता. यामध्ये तिचे काही प्रायव्हेट क्षण शूट करण्यात आले होते. हा व्हिडीओ लीक करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचा होणारा नवरा होता. यामुळे रिदाचं लग्न तर मोडलं, त्याचप्रमाणे या व्हिडिओमुळे रिदाच्या कॅरेक्टरचेही मोठे नुकसान झाले. रिदाला काम मिळणेही बंद झाले होते. मात्र याबाबत तिनं कधीच कोणतं वक्तव्य केलं नाही. 


हेही वाचा : पद्मिनी कोल्हापुरे यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी 'या' अभिनेत्यानं दिली साथ


एका पॉडकास्टमध्ये नादिर अलीशी झालेल्या संवादादरम्यान रिदा म्हणाली, मी तुम्हाला याबद्दल सांगू शकते, कारण मला वाटतं की तुम्ही मुलींचा आदर करता. जर तुम्ही कोणावर विश्वास केला आणि त्या व्यक्तीनं धोका दिला तर त्यानं तुमच्यात मानवता नाही असं दिसते. मी म्हणेन की हे फक्त अल्लाहच्या इच्छेनं होते. जो वेळोवेळी कोण कसं आहे ते दाखवतो. काहीवेळा ही शिक्षा सर्वांना खूप लवकर दिली जाते कारण अल्लाह कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसोबत चुकीचं होऊ देत नाही.  



पाहा काय म्हणाली रिदा -


रिदा पुढे म्हणाली, 'माझा विश्वास घात करण्यात आला. त्याच्याशी लग्न करायचं म्हणून मी माझ्या आई-वडिलांची मनवलं. मी असा विचार करते की मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत मला लग्न करायचे आहे. तो इतका श्रीमंत नव्हता, त्यानं मला प्रपोज केलं आणि मी होकार दिला. आमच्या साखरपुड्याच्या तीन महिन्यांनंतर, त्याने माझे प्रायव्हेट व्हिडीओ लीक केले. तेव्हा मी अमेरिकेत होते. अनेकांनी मला पत्रकार परिषद घेण्याची विनंती केली पण मी तसे केले नाही. कारण हे त्यानेच केलं होते. त्याच्यासोबत मला जगायचे आहे आणि कबरीतही त्याच्यासोबत त्याला सोबत घेऊन जायचे आहे.' 


पुढे रिदा म्हणाली, 'लोक असे मुद्दे विसरत नाहीत. तुमच्या भूतकाळात झालेल्या चुकीसाठी ते तुम्हाला प्रत्येक क्षणाला बोलत राहतात. अनेक प्रोजेक्ट्समधूनही मला बाहेर काढले. मी अनेक एजन्सींद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कारण हे काय झालं आणि कसं झालं याची मला कल्पना नव्हती. त्यानं खूप वाईट केलं होतं. माझ्या जवळच्या लोकांसमोर मला लाज वाटू लागली होती. ज्यांनी कधीच माझ्यासाठी वाईट विचार केला नव्हता, ते लोक किती दुःखी होते. या घटनेनंतर ती बिथरले होते. कुटुंबाला आणि जवळच्या माणसांना सामोरं जाणं देखील माझ्यासाठी कठीण झालं होतं.