मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल ब्रूना अब्दुल्लाहने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. आता तिने मुलीशी संबंधीत एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून पाण्यात बाळाला जन्म दिल्याचं म्हटलं आहे. या फोटोत ब्रूना मुलगी आणि पतीसोबत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करून ब्रूनाने लिहिलं आहे की, मी गरोदर राहण्याअगोदरच विचार केला होता की, मी बाळाला पाण्यातच जन्म देईन. मला असं वाटतं होतं की, माझं बाळ या जगात कोणत्याही औषधांशिवाय बाहेर यावं. त्या बाळाचा जन्म फक्त नैसर्गिकरित्या व्हावा असं मला वाटतं होतं. मी अगदी शांत ठिकाणाचा विचार केला होता जिथे मी माझ्या बाळाला अगदी नैसर्गिकरित्या जन्म देईन. मी खूप नशिबवान आहे की, मला हे सगळं करता आलं. 



ब्रूनाने आपल्या मुलीच्या जन्माची गोष्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मी माझी आई, पती आणि डॉक्टरांच्या मदतीने मुलीला गरम पाण्यात जन्म दिल्याचं तिने सांगितलं आहे. मी या पद्धतीसाठी स्वतःला तयार केलं. गरोदरपणात योग्य आहार, मेडिटेशन आणि पुरेसा व्यायाम केला आहे. याबाबत मोठी सगळी माहिती मिळवली होती. यासारख्या अनेक गोष्टी ब्रूनाने शेअर केल्या आहेत. 



मॉडेल ब्रूना हे एका हेल्थ अवेअरनेस कॅम्पेनच 'मिसिंगआय'शी जोडलेली आहे. या कॅम्पेनमार्फत ब्रूनाने आयोडीन संदर्भातील सर्व प्रश्न उभे केले आहेत. ब्रूनाने 31 ऑगस्टरोजी गोंडस मुलीला जन्म दिला. इसाबेला (Isabella) असं या मुलीचं नाव आहे. आई झाल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं ब्रूना सांगते. मला विश्वासच बसत नाही की, मी इतकं कुणावर प्रेम करू शकते, असं ब्रूना म्हणते.