मुंबई : सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे, जिथं कधी काय व्हायरल होईल आणि कशाची चर्चा होईल, याचा अंदाजही लावणं कठीण आहे. अशा या सोशल मीडियाच्या वर्तुळात एका व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीनं थेट तिच्या बेडरुममधील व्हिडीओ शेअर केल्यामुळं ही खळबळ माजली. निमित्त ठरलं ते म्हणजे यामध्ये दिसणारं तिचं बोल्ड रूप. 


 'साहो' (Saho) या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण करणारी आणि बेडरुम व्हिडीओमुळे गाजणारी ही अभिनेत्री आहे, दामिनी चोप्रा (Damini Chopra). 


असं म्हणतात की, कोणतीही व्यक्ती ही झोपेतून जागी होतानाच कमालीची सुंदर दिसते. दामिनीचा हा व्हिडीओ पाहताना यावर अनेकजण विश्वास ठेवत आहेत. 


झोपेतून जाग येत असताना दामिनी उठते आणि तेव्हाच तिच्या सौंदर्याची एक वेगळीच बाजू सर्वांना दिसते. बस्स.... मग काय, चर्चांना उधाण येणं स्वाभाविक नाही का? 


स्क्रीनवर प्रभाससोबत झळकलेल्या या अभिनेत्रीचा भलताच बोल्ड अंदाज या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 



तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळाले आहेत. लाईक्सहूनही तिच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्स पाहण्याजोग्या आहेत. 


हे म्हणजे चाहत्यांनी एक स्वप्न पाहिलं, ज्यामध्ये त्यांना एक स्वप्नसुंदरी दिसली आणि ते तिच्या रुपावर भाळले..... डोळे उघडून मोबाईल हातात घेतात तर काय, दामिनीच्या रुपात ती सुंदरी समोरच उभी राहिली...