मुंबई : बाळाला जन्म देत असताना महिलेचाही नवा जन्म होत असतो, असं अनेकदा म्हटलं जातं. मुळात बाळ जसजसं मोठं होत असतं तसतसा आईचा नवा जन्म आणखी परिपक्व होताना दिसतो. पण, एका अभिनेत्रीची आईची हीच भूमिका सुरुवातीलाच काहीशी डगमगताना दिसत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्या नवजात मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्री तिच्या मुलीला कुशीत घेऊन चालताना दिसत आहे. 


गाणं गुणगुणत त्या तालावर ती डुलतानाही दिसत आहे. पण, मुलगी इतकी लहान आहे की, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. परिणामी या अभिनेत्रीची अनेकांनीच शाळा घेतली आहे. 


ही अभिनेत्री आहे, देबिना बॅनर्जी. देबिना तिच्या मुलीच्या जन्मापासूनच तिची काळजी नेमकी कशी घेतली जात आहे, यासंबंधीचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. यातच तिनं आता एक असा व्हिडीओ शेअर केला, जो फॉलोअर्सना मात्र रुचला नाही. (debina bonnerjee daughter)


कारण, गाण गात आणि त्या तालावर संथपणे डुलत देबिनानं तिच्या मुलीला एकाच हातात ज्या पद्धतीनं पकडलं आहे, ते चुकीचं असल्याचं अनेकांचं म्हणणं. 


ते बाळ आहे, खेळणं नाही.... ; कळत नाही का तुला.... तिला नीट पकड....; तू खूप चांगली आई आहेस वगैरे सर्व ठीक, पण मुलीला तू ज्या पद्धतीनं पकडलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे, अशा शब्दांत देबिनाला फॉलोअर्स आणि नेटकरी रागे भरताना दिसत आहेत. 



थट्टा- मस्करीच्या वेळी मस्करी पण, गंभीर प्रसंगी नको ते ट्रेंड सेट करु नकोस, असं म्हणत अनेकांनीच तिली शाळा घेतली. 


लहान मुलीच्या काळजीपोटी येणाऱ्या या कमेंट पाहता देबिनाच्या लेकिची सर्वांनाच किती काळजी आहे, हेसुद्धा स्पष्ट झालं.