Debina Bonnerjee Lactating Breast Feeding : आजकाल अनेक अभिनेत्री या आपल्या गरोदरपणातील अनुभवांबद्दल खुलेआपपणे बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते. सध्या अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. देबिनानं हिनं IVF तंत्रज्ञानाद्वारे दोन मुलींना जन्म दिला आहे. सोशल मीडियावर ती आपल्या दोन्ही मुलींचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येते परंतु असं असलं तरी आपल्या खाजगी गोष्टींबद्दल ती आगत्यानं आपल्याला आलेले वाईट आणि चांगले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करते. देबिना ही इन्टाग्रामवर सक्रिय आहेच, सोबतच ती युट्युबवरही खूप जास्त सक्रिय आहे. युट्युबवर देबिना आपले नाना तऱ्हेचे व्हिडीओ शेअर करत असते. त्यातून आपल्या गरोदरपणाबद्दल आणि स्तनपानाच्या अनुभवांबद्दलही ती अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देबिना आपले व्हिडीओज (Vlogs) हे सोशल मीडियावर शेअर करते त्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा असते. अशाच एका व्हिडीओमध्ये तिनं आपल्या ब्रेस्टफिडिंगबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली की,''सुरूवातीला या प्रक्रियेत मला बरेच चढ-उतार पाहावे लागले. परंतु जेव्हा ब्रेस्टफिडिंगची प्रक्रिया सुरू होते तेव्हा मात्र मला आलेला अनुभव हा फारच सुखदाई होता. तुमच्या शरीरात खुप मोठा बदल होत असतो आणि तो प्रचंड आनंद देणारा असतो. मी आत्तापर्यंत कुठल्याही महिलेकडून हे ऐकलेले नाही की स्तनपान करणं हे सोप्पं असतं. स्तनांना सूज येणे, वेदना होणे, बाळ दूध पित असताना चावणे अशा अनेक समस्या होताना दिसतात.''


हेही वाचा - Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता


यापुढे बोलताना ती म्हणाली की, ''ही प्रकिया सुरूवातीला कठीण वाटते परंतु नंतर महिना झाला की हळूहळू सगळं नीट होऊ लागते. त्याचसोबत तुम्हाला अनेक गोष्टी करायला सोप्प्याही जातात. ही प्रक्रिया खरंतर खूप निराळी आहे. यातून बाळ आणि आईमधील नातं अधिकच घट्ट होते. त्यानं त्या दोघांना जवळ आणले जाते, असं मी समजते'' 


दुसऱ्या प्रेग्नंन्सीनंतर दूध... 


देबिनानं खुलासा केला की तिला दुसऱ्या प्रेग्नंन्सीनंतर दूध व्यवस्थित येण्यास सुरूवात झाली. देबिनाला दोन मुली आहेत. आपली दुसरी मुलगी दिविशा हिच्या जन्मानंतर तिला स्तनपानाचा वेगळाच अनुभव आला आहे. त्याबद्दलही तिनं मोकळंपणानं सांगितलं आहे. सध्या देबिना आणि गुरमित आपलं फॅमिली लाईफ हे एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी देबिनाचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.