मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री काय करतात, काय खातात हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता असते. पण चाहत्यांना ही गोष्ट जाणून घेण्यात सर्वाधिक उत्सुकता असते की, अभिनेत्रींच्या पर्समध्ये नक्की काय असतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल बोलायचं तर तिच्या बॅगेत काय असेल हे तर समजलंच पाहिजे.



वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, दीपिका पदुकोणने 'What's in my bag' या सेशनमध्ये तिच्या बॅगमध्ये कोणत्या आवश्यक गोष्टी ठेवते हे दाखवलं.


दीपिका पदुकोणने सांगितले की, ती तिच्या बॅगमध्ये हँगओव्हरपासून रिलीफ मिळण्यासाठी काही औषध ठेवते आणि त्या औषधाचं नाव Alka Seltzer आहे.



या हॅंगओव्हर रिलीफ टॅब्लेटमुळे डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यांसारखी हॅंगओव्हरची लक्षणे कमी होतात. याशिवाय माऊथ फ्रेशनर, पेन्सिल-डायरी देखील ठेवते तसंच दीपिका तिच्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन आणि बँडेज ठेवते. 



तासनतास शूटिंग केल्याने मानसिक आणि शारिरीक थकवा येणं साहजिक आहे. हा थकवा घालवण्यासाठी अनेक कलाकार आपल्यासोबत या टॅब्लेट ठेवतात.