Ganesh Chaturthi 2022 : महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. केवळ मुंबईकरच नाही तर यूपी आणि बिहारमधून या शहरात स्थलांतरित झालेले लोकही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. इतर शहरांतून मुंबईत स्थायिक झालेल्या कलावंतांवरही या महोत्सवाची रंगत चढते. स्टार प्लसच्या साथ निभाना साथिया या मालिकेत गोपी बहूच्या भूमिकेतून घरोघरी प्रसिद्ध झालेली देवोलीनाही गेल्या 10 वर्षांपासून गणपती उत्सव साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच एका खास संवादादरम्यान देवोलिना भट्टाचार्जीने सांगितले की, जेव्हा तिने पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना केली तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 10 वर्षांपूर्वी देवोलीना भट्टाचार्जी यांना गणपती उत्सवादरम्यान या समस्येचा सामना करावा लागला होता


देवोलीनाने एका मुलाखतीत सांगितले की 10 वर्षांपूर्वी तिनं गणपती बाप्पाची स्थापना केली तेव्हा तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळचा किस्सा आठवताना देवोलीना म्हणाली की पहिल्या वर्षी मी गणपती आणत होते तेव्हा मला विचित्र अनुभव झाला होता. बाप्पाच्या जागेची सजावट करण्यासाठी मी डेकोरेशनच्या व्यक्तीला एक दिवसापूर्वी बोलावले होते. मात्र रात्री 12 वाजेपर्यंत तो आलाच नाही. आम्ही सतत फोन केला असता सर्वजण मद्यपान करत होते, असे नंतर समजले. 


देवोलीनाने पुढे सांगितले की, जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तिच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काही लोकांनी तिला गणपती बसवण्यापूर्वी डेकोरेशनमध्ये मदत केली आणि तिने रात्रभर न झोपता सजावट केली आणि न झोपता पहाटे पाच वाजता उठल्यानंतर तिने आंघोळ केली, असा किस्सा तिनं यावेळी सांगितली. 


देवोलिना टेलिव्हिनजन अभिनेत्री असून ती बिग बॉसच्या पर्वातही झळकली होती.