Disha Patani Trolled Uorfi Javed: फॅशन ही मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यातून आता फॅशनचे रूपडेही (Disha Patani Revealing Saree) काळानुसार अधिक भडक होऊ लागले आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातून आता फॅशन ही काही साधीसुधी राहिलेली नाही. फॅशनच्या नावाखाली आता मोठ्या प्रमाणात विक्षिप्तपणाचा (Fashion Trends 2023) आधार घेतला जातो आहे. उर्फी जावेद हे त्यातलं एक जिवंत उदाहरण. परंतु आता हिंदी चित्रपटांमध्ये आणि बॉलिवूड सेलिब्रेटींमध्येही विचित्र आणि आगळ्या वेगळ्या (Vulgar Fashion) फॅशनला वाव मिळतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचे दाखले मिळाले ते म्हणजे नुकत्याच झालेल्या नीता अंबानीच्या (Neeta Ambani Party) या उच्चभ्रु पार्टीत. यावेळी मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे त्यांच्या फॅशनची यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली पाहायला मिळाली. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेत्री दिशा पटानी हिच्याकडे. (Actress Disha Patani gets trolled after wearing revealing saree at the nmacc event video viral)


इन्टाग्रामवर नेहमीच आपले बोल्ड आणि सेमी न्यूड फोटो शेअर करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani Bold Photos) आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल लुकसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोंना इन्टाग्रामवर प्रचंड लाईक्स येत असतात. परंतु त्याचसोबत दिशा आपल्या या बोल्ड लुकमुळे अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही येते आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू होते. यावेळी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani Latest Look) पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी दिशाला आपल्याच चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली आहे. यावेळीही कारणंही ठरलं आहे फॅशनच. 


आपल्या बोल्ड फॅशनमुळे ओळखली जाणारी दिशा आपल्याच या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं नीता अंबानींच्या पार्टीला (NMACC India) हजेरी लावली होती. तिनं यावेळी परिधान केलेली साडी ही अत्यंत सुंदर असली आणि तिही त्या साडीत अत्यंत सुंदर दिसत असली तरी तिला मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी दिशानं असं काय केलं? 


'त्या' साडीमुळे ट्रोल


साडी हे एक अत्यंत सुंदर असं वस्त्र आहे. या साडीला पारंपारिक महत्त्व आहे. आजच्या काळात मुली आणि महिला आवडीनं साडीचा शृंगार करताना (Disha Patani Dress) दिसतात. परंतु दिशा घातलेला ब्लाऊज आणि तिची साडी ही इतकी रिव्हिलिंग होती की त्यामुळे नेटकऱ्यांनी 'व्हलगर', 'डर्टी' अशा कमेंट्स केल्या. त्यातून तिची फॅशन पाहून आता उर्फी जावेदचं करिअर धोक्यात आहे अशी खोचक टिकाही एका युझरनं केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिशाला साडी घालणं पडलं महागात


नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च इव्हेंटला दिशा पटानीनं हजेरी लावली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसले. या गाला पार्टीला पाश्चात्त्य  गाला पार्टीप्रमाणे सादर करण्यात आले होते. यावेळी दिशाचा एक बोल्ड लुक असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात दिशानं स्ट्रेपलेस ब्रालेट आणि अत्यंत रिव्हिलंग साडी घातली होती.