नवी दिल्ली : बॉलिवू़ड अभिनेत्री दिशा पटानी हीने अलीकडेच चित्रपटसृष्टीत पर्दापण केले असले तरी तिच्या फॅन्सची संख्या दिवसागणित वाढत आहे. 'एमएस धोनी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती 'कुंग फू योगा' या चित्रपटात हॉलीवूडचा सुपरस्टार जॅकी चॅनसोबत झळकली. आणि लवकरच ती  टाइगर श्रॉफच्या 'बागी-2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


 तिने लग्न केले का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच बॉलिवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत भारताबाहेर गुपचूप लग्न केले. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असताना अभिनेत्री दिशा पटानी वेडींग फोटोशूट लक्षवेधी ठरत आहे.
अलीकडेच तिचे वेडींग फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले. म्हणजे खऱंच तिने लग्न केले का?


तर असे अजिबात नाही. हे फोटोशूट तिने ब्राईडल इंडिया कंपनीसाठी केले आहे. हे फोटोशूट वेडिंग स्टायलिंग दाखवण्यासाठी केले आहे. 



'बागी-2' चे शूटींग सुरू


त्याचबरोबर दिशाचा आगामी चित्रपट 'बागी-2' चे देखील शूटींग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दिशा आणि टायगरने सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सना ही बातमी दिली.