मुंबईः आजकाल टेलिव्हिजन अभिनेत्रींना सोशल मीडियावर फोलो करणारे असंख्य चाहते आहेत. त्यातीलच एक नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हीच. नऊ वर्षांपुर्वी गाजलेल्या 'ये हें मोहोंब्बते' या हिंदी मालिकेतून दिव्यांका हिने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर अनेक रिएलिटी शोज्समधूनही दिव्यांकाने काम केले आहे. 'ये हें मोहोंब्बते' या मालिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता आजही ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली टेलिव्हिजनवरील ओळख तिने मेहनतीच्या आणि संघर्षाच्या जोरावर मिळवली आहे. टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने घराघरात नाव कमावणाऱ्या दिव्यांकाने नुकताच एक खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हीही कदाचित थक्क व्हाल. दिव्यांकाने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण शेअर करत त्या दिवसांमधील काही कटु आठवणी जागृत केल्या आहेत. 


करिअरच्या सुरुवातीच्या काळात दिव्यांकाने डीडी नॅशनलच्या शोमध्ये काम केले. 'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेमध्ये विद्याची भूमिकामुळे तिला खरी ओळख मिळाली पण.. या शोने जेवढी तिला लोकप्रियता दिली तेवढाच या शोमुळे तिला त्रासही सोसावला लागला. 


दिव्यांका त्रिपाठी 'बनून मैं तेरी दुल्हन'मध्ये विद्या प्रताप सिंगच्या भूमिकेत दिसली होती आणि तेव्हापासून तिला काम मिळणे बंद झालं त्यामुळे येथून पुढे दिव्यांकाला तिचे करिअर रूळावर आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान दिव्यांकाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या प्रकारच्या नकारांचा (Rejection) सामना करावा लागला हे उघड केलं आहे. 


यावर व्यक्त होताना दिव्यांका म्हणाली की, 'मी आयुष्यात कधीही नकाराला 'नकार' म्हणून घेतले नाही. मला कोणत्याही प्रोजेक्टचा भाग बनवले नाही तर तिथे माझी काही गरज नाही असे मला वाटायचे आणि मला वाटायचे की माझ्यापेक्षाही जास्त टेलेंटेड आणि सुंदर अभिनेत्रीच्या निर्माते शोधात असतील.''


दिव्यांका पुढे म्हणाली की, ''बनू में तेरी दुल्हनमध्ये मी टेलिव्हिजनवरील एकता कपूरच्या तुलसी आणि पार्वती यांच्यासारखी टाइपकास्ट होते. कुठेतरी हेच कारण होते की अनेक शोच्या निर्मात्यांनी मला परत कास्ट केले नाही.''


''निर्माते म्हणायचे की तू तुलसी आणि पार्वतीसारखी वाटतेस त्यामुळे तुला पुन्हा कास्ट करता येणार नाही. कारण तुम्हाला बघायला कोणालाच आवडणार नाही.'' याबाबत दिव्यांका पुढे म्हणाली की, 'या अशा अनुभवाने मी खचूनगही गेले आहे आणि सामान बांधून भोपाळला परत जावं असंही मला अनेकदा वाटलं आहे पण काहीतरी होतं माझ्यात ज्याने मला इथे थांबवलं'', अशाप्रकारे दिव्यांकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.