मुंबई : काही कलाकारांची ओळख ही त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. मग त्या भूमिका कौटुंबीक असो, किंवा बोल्ड. प्रत्येक भूमिका ही नव्यानं कलाकारांची ओळख तयार करत असते. अभिनेत्री ईशा गुप्ता हिचीही अशीच ओळख तयार झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा गुप्ता (Esha Gupta)ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. बऱ्याच चित्रपटांमध्ये तिनं दिलेल्या बोल्ड सीनची तितकीच चर्चाही झाली. 


मादक लूक, बोल्डनेसची जोड अशाच रुपात ती कायम सर्वांसमोर येते. विविध अभिनेत्यांसोबतची तिची केमिस्ट्री कायमच अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. 


पण तुम्हाला माहितीये का, एका अभिनेत्रीसोबतही ईशानं बोल्ड सीन दिला. एका वेब सीरिजसाठी तिनं हा सीन साकारला होता. 



'नकाब' नावाच्या या सीरिजमध्ये ती अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यासोबत लिपलॉक करताना दिसली. तिच्या या इंटिमेट सीनची अमर्याद चर्चा झाली. 


या दोन्ही अभिनेत्रींचा हा सीन इतका बोल्ड होता, की तो कुटुंबीयांसमोबत पाहणंही अनेकांसाठी कठीण. 


याच सीनबाबत सांगताना मल्लिका म्हणाली होती, की एका पुरुषापेक्षा महिलेसोबत इंटिमेट होणं जास्त सोपं असतं. एका महिलेशी जवळीक साधताना आपल्याला कोणतीही अडचण आली नसल्याचं ती म्हणाली. 



दरम्यान, फक्त मल्लिकाच नव्हे, या सीरिजमध्ये ईशानं अभिनेता गौतम रोडे याच्यासोबतही एक इंटिमेट सीन दिला होता.