मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवीने सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांबाबत असलेल्या दुरावस्थेवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने पुरूषांच्या अस्वच्छतेबाबत राग व्यक्त केला आहे. वेस्टर्न टॉयलेटच्या वापराबाबत पुरूषांना हेमांगी कवीने खडेबोल लगावले आहे. पुरूषांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना कॉमन टॉयलेट वापराना किती समस्यांना सामोरं जावं लागतं, याबाबत आपलं मत तिने या पोस्टमधून शेअर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक सार्वजनिक ठिकाणी आता कमोड बसवलेले असतात त्याचप्रमाणे महिला आणि पुरूषांकरता कॉमन एकच टॉयलेट असतं. अशावेळी पुरूषांच्या अस्वच्छ स्वभावामुळे महिलांना अनेक त्रासातून जावं लागतं. मासिक पाळीच्यावेळी तर त्यांना असंख्य समस्यांना सामोरं जावं लागतं. 


हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट 


हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets  म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच toilet असतं. अश्यावेळी ते toilet कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून! 
पुरुष मूत्र विसर्जन करताना commode च्या ring वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या commode वर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? 


हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच...

Posted by Hemangi Kavi-Dhumal on Sunday, August 9, 2020

हेमांगी कवीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सोमवारी हेमांगीने ही पोस्ट शेअर केली आहे. आतापर्यंत या पोस्टला १.३ हजार लोकांनी लाईक केलं आहे. २८७ लोकांनी कमेंट केलं आहे तर १८७ लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली अनेक पुरूषांनी देखील संताप व्यक्त केला आहे.