Ileana D'cruz Pregnancy: अभिनेत्री इलियाना डिक्रुजनं (Ileana D'cruz Baby Bump) आपण गरोदर असल्याचे सोशल मीडियावरून घोषित केले. 18 एप्रिलला तिनं आपली ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांनी दिली. त्यानंतर आता तिनं आपल्या बेबी बंपचाही फोटो सोशल मीडियावर स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. त्यामुळे सध्या सगळीकडे हीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स हे आपल्या घरी येणाऱ्या नव्या पाहूण्याच्या आगमनानं खुश झाले आहेत तर दुसरीकडे काही कपल्स हे नव्यानं घरी येणाऱ्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यातीलच एक आहे इलियाना डिक्रुज. आपल्या मातृत्वाच्या चाहूलीनं सध्या ती खूपच एक्साईटेड (Ileana D'Cruz Pregnancy Experience) झाल्याचे पाहायला मिळते आहे. इन्टाग्रामवरून ती याबद्दल तिच्या चाहत्यांना अपडेट करते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी इलियानानं आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या घोषणेनं एकप्रकारे तिनं आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता तिनं पहिल्यांदाच आपला बेबी बंपचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सध्या ती आपलं मातृत्व एन्जॉय करताना दिसते आहे. इलियानानं नुकताच तिचा एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बेडवर झोपून राहण्याचा प्रयत्न करते. या अवस्थेतला फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''जेव्हा तुम्हाला झोपायचं असतं परंतु बाळानं (Baby Started Dance Party) तुमच्या पोटात तर डान्स पार्टी करण्याचा निर्णय घेतलेला असतो.'' यामधून बेबी किकचा गोड अनुभव तिनं शेअर केला आहे. 


हेही वाचा - Smriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत


काही दिवसांपुर्वी, म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न झाल्यापासून इलियाना ही कतरिनाच्या (Katrina Kaif Brother) भावाला म्हणजेच सेबॅस्टियन कैफला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता इलियाना कतरिनाची वहिनी होणार का अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. परंतु अद्याप इलियाना हिनं आपल्या बॉयफ्रेंडबद्दल कोणतीच माहिती रिव्हिल केलंली नाही त्यातून तिनं आपल्या गरोदरपणाची बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इलियानाच्या या फोटोवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. यामध्ये नेटकरी अनेक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. 



इलियाना डिक्रुज शेवटची 'द बिग बुल' या चित्रपटातून दिसली होती. आता तिचा 'अनफेअर एन्ड लव्हली' (Ileana D'cruz Latest film) हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मधल्या काही काळात इलियाना चित्रपटांपासून दूर होती परंतु आता तिनं आपल्या चित्रपटांची घौडदौड सुरु केली आहे. आता ती आपल्या प्रेग्नंन्सीच्या बातमीमुळे चर्चेत आहे.