Photos : मुंबईत तुफान पाऊस; संध्याकाळी 5 वाजता रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार

भर दिवसा अंधारात बुडालेल्या मुंबईचे सुंदर फोटो. 

| Sep 25, 2024, 19:39 PM IST

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारपासूनच मुंबईत ढगाळ वाचावरण होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत सर्वत्र काळाकुट्ट अंधार पडल्याचे चित्र पहायला मिळाले. यानंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 

1/7

विश्वास बसणार नाही पण हे फोटो संध्याकाळी 5 वाजता काढलेत आहेत. मुंबईत भरदिवसा रात्रीसारखा अंधार पडला होता. 

2/7

 मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

3/7

मुंबईला उद्यापर्यंत म्हणजेच 26 सप्टेंबर सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

4/7

परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा, इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला.

5/7

मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला देखील बसला आहे. मध्य रेल्वेची वाहचूक विस्कळीत झाली आहे.

6/7

मुंबईत पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी ही साचल्याचे चित्र पहायला मिळत आहे.   

7/7

मुंबईकरांनी भर दिवसा रात्रीचा अनुभव घेतला. कारण, मुसळधार पावसाआधी मुंबईत काळाकुट्ट अंधार पडला होता.