मुंबई : चित्रपट उद्योगाची चमक पाहून आपल्या त्या फिल्मी दुनियेचे खूप आप्रुप वाटते. काही वेळेला आपल्याला ही असे आयुष्य जगावेसे वाटते. हे लोकं खूप आनंदाने जगत असताता, या सेलेब्रिटींना जगात कोणतेही त्रास नसावे असे आपल्याला वाटते. परंतु हे खरे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ज्याप्रमाणे दु:ख आणि प्रॉब्लम्स येतात, त्याप्रमाणे सिनेतारकांच्या आयुष्यात देखील काही ना काही चढ उतार सुरूच असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु अनेक असे चित्रपट कलाकार आहेत जे, गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ज्याबद्दल आपल्या माहित देखील नाही. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्द्ल सांगणार आहोत, जी पडद्यावर अतिशय ग्लॅमरस आणि मोहक दिसत आहे. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र ती गंभीर आजाराने त्रस्त आहे.


या अभिनेत्रीचे नाव आहे इलियाना डिक्रूझ जिने बॉलिवू़डमध्ये ज्याने रुस्तम, ते मैं तेरा हीरो, आणि बर्फी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.


इलियाना डिक्रूझ ने दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? इलियाना बॉडी डिसमॉर्फिया नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे.


अलीकडेच, इलियानाने तिच्या वैद्यकीय स्थितीबद्दल खुलासा केला होता. अभिनेत्रीने सांगितले होते की, एक काळ असा होता जेव्हा तिला स्वत:ला आरशात बघण्याची इच्छा व्हायची नाही. असे खूप कमी लोकं आहेत, ज्यांना शरीराच्या या रोगाबद्द्ल माहिती असेल.


इलियानाला तिच्या शरीरात दोष दिसतात


तज्ञांच्या मते, ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीरात दोष आढळतात. याशी झुंज देणारे लोकं स्वत:मध्ये नेहमी कमी पाहतात. यामुळे ग्रस्त रुग्णांना त्यांच्या शारीरिक स्वरुपात किंवा त्यांच्या त्वचेमुळे खूप अस्वस्थ वाटते. इलियानालाही असेच वाटायचे. तिने तिच्या एका पोस्टमध्ये याचा खूलास केला.


स्वतःचा एक फोटो शेअर करताना इलियानाने लिहिले, 'मी नेहमी कशी दिसते याबद्दल मला नेहमीच काळजी वाटत होती. मी काळजी करायचे की, माझे हिप्स खूप रुंद आहेत, माझ्या मांड्या वाकड्या आहेत, मी पाहिजे तशी सडपातळ नाही, माझे पोट सपाट नाही, माझे स्तन लहान आहेत आणि माझे बट मोठे आहे, माझे हात सुंदर नाहीत, माझे नाक सरळ नाही, माझे ओठ लहान आहेत ... मला काळजी वाटते की मी पुरेशी उंच नाही, मी पुरेशी सुंदर नाही, मी हुशार नाही."