मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. ती म्हणाली की, "मला जोपर्यंत चांगली व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत मी सेटेल्ड होणार नाही. पण मला आई होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही." जॅकलिन सध्या रेस ३ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 


 मेहनतीने बॉलिवूडमध्ये नाव कमावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलिनने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. गेल्या काही दिवसांपासून  सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘ए जेंटलमॅन’च्या शूटींगपासून त्यांच्या काहीतरी वेगळे शिजते आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यापूर्वी तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबतही जोडले गेले होते. 


मॉडेल म्हणून करिअरला सुरूवात 


मॉडेल म्हणून जॅकलिनने आपल्या करिअरला सुरूवात केली. २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब तिने जिंकला आणि मग बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.