डीप नेक बॅकलेस गाऊनमध्ये जान्हवी कपूरचं फोटोशूट..चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका
जान्हवी कपूरचं फोटोशूट सध्या चर्चेत आहे. डीप नेक गाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
मुंबईः श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर खूपर ऍक्टिव्ह असते. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या स्टाइलमुळे देखील चर्चेत असते.
यावेळीही जान्हवीनं असं काही केलंय की तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. डोळ्यांच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी जान्हवी विंक गर्ल प्रकाश वॉरियरपेक्षा काही कमी नाही.
जान्हवी कपूरने केलेल्या या नवीन फोटोशूटमध्ये चमकदार व्हायलेट कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये दिसत आहे. या गाऊनसोबत तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. जान्हवी कपूरचा हा स्टाईलिश अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत, तिच्या गाऊनचा डीप नेक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. जान्हवी कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'दोस्ताना 2' मध्ये लक्ष्य लालवानीसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'गुड लक जेरी'मध्येही दिसणार आहे. ,