Jannat Zubair Buys Home: वयाचे बंधन हे कशालाच नसते. ना ते प्रेमाला ना यशाला. आज मुर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणावं अशी फार थोडीच उदाहरणं राहिली असली तरीसुद्धा असेही तरूण तुर्क आहेत ज्यांनी फार कमी वयातची मोठी भरारी घेतली आहे. आजकाल तरूण पिढीची achievements बाबतची कल्पनाही बदलत जात आहे. आज आपल्या बळावर ते स्वतंत्र होत आहे आणि यशस्वीही होताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे जन्नत झुबेर हिची. घर घेणं हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आपल्या स्वप्नातलं घर मिळणं ही आपल्यासाठी अत्यंत मोठी achievement असते. वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेत्री जन्नत झुबेर हिनं आपल्या स्वप्नातलं घरं घेतलं आहे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या या नव्या यशाबद्दल ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जन्नत म्हणाली, मी खूपच खुश आहे. सध्या माझ्या मनात गर्वाची भावना आहे आणि आता मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहे ज्यांनी मला माझ्या स्वप्नात मदत केली. माझ्यासाठी हा एका आशीर्वादच आहे. मी फार स्वत:ला नशीबवान समजते की मी हे मिळवू शकले. माझ्या परिवारानं आणि माझ्या या इंडस्ट्रीतल्या जवळच्या लोकांनी मला फार मदत केली. मध्यंतरी बॉलिवूडमध्ये नवे घर, नवी गाडी घेण्याचे आपले स्वप्न अनेक अभिनेत्री आणि अभिनेते पुर्ण करताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडेच त्यांची चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सान्या मल्होत्री हिनं दिल्लीच्या गुरगांव येथे घर घेतले. तर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं देखील आपलं स्वप्नातलं घर घेतलं. दोघींनीही आपल्या गृहप्रवेशाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 


आता जन्नत ही लवकरच 'खतरों के खिलाडी' च्या 12 व्या पर्वात सहभागी होणार आहे. यापुर्वी तिनं अनेक हिंदी मालिकांतून आणि चित्रपटांतून कामं केली आहे. ती लहानपणापासून या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे अनेकदा तिची चर्चाही होताना दिसते. ती इन्टाग्रामवरही एक्टिव्ह असते. सोबतच आपल्या नवनव्या फोटोंनी आणि व्हिडीओज ती आपल्या चाहत्यांनाही अपडेट ठेवत असते. तिनं 'तू आशिकी', 'फूलवा', 'आप के आ जाने से' अशा काही लोकप्रिय मालिकांतूनही ती दिसली होती. 


हेही वाचा - VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....'


काही दिवसांपूर्वी तिची चर्चा रंगली होती. एका मालिकेसाठी तिला किसिंग सीन ऑफर करण्यात आला होता. ज्यासाठी तिनं नकार दिला होता. याबद्दल तिनं आपल्या पालकांचे आभार मानले होते आणि आपल्या पालकांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे ती आपल्या वडिलांची आणि आईची ऋणी होती.