मुंबई : फॅशनच्या नावाखाली काही मंडळी कधी काय करतील याचा नेम नसतो. अशाच मंडळींपैकी एक अभिनेत्री सध्या चर्चांच्या वर्तुळात केंद्रस्थानी आली आहे. आपण वाणसामानाच्या खरेदीला जाताना सहसा मोठ्या पिशव्या वगैरे घेऊन जातो. अगदी साधेच कपडे घालून जातो. पण, या अभिनेत्रीनं मर्यादाच ओलांडल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कान्ये वेस्टची प्रेयसी म्हणूनही कधीकाळी गाजलेली ही अभिनेत्री म्हणजे ज्युलिया फॉक्स. ब्रेकअपनंतर ज्युलिया जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हा तेव्हा तिच्या चित्रविचित्र फॅशननं नजरा खिळवून ठेवल्या. (actress julia fox went for shopping in two piece photos viral )


तसं, अशा फॅशनसाठी चर्चेत येण्याची ज्युलियाची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, वाणसामानाच्या खरेदीसाठी निघताना तरी किमान फॅशन सेन्स बाजूला ठेवायला हवा होता, हीच अपेक्षा तिचे नवे फोटो पाहणारे व्यक्त करत आहेत. 


नुकतेच तिचे काही फोटो समोर आले. या फोटोंमध्ये ती चक्क वाणसामान खरेदीसाठी गेली असता तिथं जाताना तिनं टू पीस लूकला प्राधान्य दिलं. झोळी म्हणून तिनं जिन्सचा वापर केला. 


अनेकदा सेलिब्रिटी फॅशनेबल राहण्यासाठी मर्यादांचीही धुळधाण करतात. ज्युलियाचा हा लूक म्हणजे त्यापैकीच एक असल्याची प्रतिक्रिया तिचे फोटो पाहणाऱ्यांनी दिली. 



काळ्या रंगाच्या इनरवेअरवर तिनं डेनिम जॅकेट घातलं होतं. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं डेनिमचे बूटही घातले होते. हे आपले सर्वात आवडीचे बूट असल्याचा खुलासा ज्युलियानं फार आधीच केला होता. 


तिचा हा लूक सर्वांनाच भावला असं नाही. बऱ्याचजणांनी या लूकमुळं ज्युलियाची खिल्लीही उडवली. फॅशनेबल होण्यात गैर काहीच नाही, पण तिथंही काही मर्यादांचं पालन होणं गरजेचं अशाच प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या.