मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol) हिला तिच्या 46 व्या वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांपासून सेलिब्रिटी मित्रमंडळींपर्यंत सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. मुळातच काजोलच स्वभाव हा खेळकर असल्यामुळं अनेकांनीच तिला या अंदाजात शुभेच्छा दिल्या. पण, तिचा पती, अभिनेता अजय देवगन याच्या शुभेच्छा अर्थातच या साऱ्यामध्ये अतिशय खा ठरल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलसोबतचा अतिशय बोलका फोटो अजयनं शेअर केला. सोबत त्यानं लिहिलं, 'माझ्या चेहऱ्यावर बऱ्याच काळापासून हास्य आणणं सुरेखपणे जमवलंस गं तू... तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा दिवस जितकी तू खास आहेस तितकाच खास करण्याचा प्रयत्न करेन.' 


काजोलसाठी अजयने (ajay devgan) लिहिलेले हे शब्द आणि त्याच्या मनातील भावना खूप काही बोलून गेल्या. याला चार चाँद लावले ते म्हणते त्यानं पोस्ट केलेल्या फोटोने. 




हिंदी सेलिब्रिटी वर्तुळातील 'स्टार कपल' म्हणून ओळख 
बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवल्यानंतर काजोलनं तिच्या कुटुंबालाही केंद्रस्थानी ठेवलं. काजोल आणि अजय देवगन ही जोडी 'स्टार कपल'च्या यादीत सर्वाधित लोकप्रिय जोडी ठरली आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 24 फेब्रुवारी 1999 मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. एका सेटवर त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता ही ओळख आणखी दृढ झाली. या नात्यात दोघांपैकी कोणीही एमेकांना प्रपोज केलं नाही. पण, 4 वर्षे डेट केल्यानंतर एकमेकांसोबत राहायचंय हे त्यांनी जाणलं आणि सहजीवनाची सुरुवात केली.