Actress Kajol’s Hilarious Replay To Trollers : अभिनेत्री काजोल (Actress kajol) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सावळ्या रंगाची एखादी अभिनेत्री बॉलिवूडवर (Bollywood News) राज्य करेल, असा तो काळ निश्चितच नव्हता. मात्र, आपल्या अभिनयाने काजोलने सर्वांची मनं जिंकली. काजोल आता फारशी चित्रपटांमध्ये दिसत नाही. मात्र, एक काळ होता. कालोज म्हणजे हुकमी एक्का... चित्रपट हिट (Actress kajol Hit Movies) ठरलाच म्हणून समजा. सध्या चित्रपटातून लांब असली तरी सोशल मीडियावर मात्र ती खूपच सक्रिय असते. अशातच तिची एक पोस्ट (Actress kajol Instagram Post) चर्चेचा विषय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रोलिंग (Trolling) ही सोशल मीडियावरील सर्वात विचित्र गोष्ट असल्याचं मत काजोलीने व्यक्त केलं होतं. अशा ट्रोलिंगला अजिबात गांभीर्याने घेऊ नका, ती स्वतः गांभीर्याने घेत नाही, असं काजोल म्हणाली आहे. सावळ्या रंगावरून काजोलला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला काजोलने सडतोड प्रत्युत्तर दिलंय.


काय म्हणाली काजोल?


काजोलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात काजोलने स्वतःचा चेहरा एका मास्कने पूर्णपणे झाकलाय. तर पुर्ण चेहरा झाकला जाईल, असं काळ्या रंगाचं मास्क देखील तिने घातलंय. तसेच तिने काळा गॉगल देखील घातलाय. त्याला कॅप्शन देत काजोल म्हणते...


'जे मला सतत विचारत राहतात की, मी इतकी गोरी कशी झाली? त्यांच्यासाठी...’ स्टोरीमध्ये हॅशटॅग वापरून तिने त्वचेचं सूर्यप्रकाशापासून कशाप्रकारे बचाव करते, असं उत्तर (Actress Kajol’s Hilarious Replay To Trollers) दिलं आहे.



आणखी वाचा - Sara Ali Khan बरोबर विमानतळावर असं काही झालं...., Video पाहून सर्वच अस्वस्थ


दरम्यान,  करिअरमधील (Kajol Movies) 10 वर्ष मी सातत्यानं ऊनात काम करत होते. त्यामुळे माझी त्वचा टॅन झाली होती. त्यानंतर मी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतलेली नाही. ही कोणतीही शस्त्रक्रियेची नाही तर घरी राहण्याची कमाल आहे, असं उत्तर काजोलेने एका मुलाखतीत बोलताना दिलं होतं. 1995 मध्ये प्रदर्शित झालेला DDLJ हा चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो. 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  केवळ एका आठवड्यासाठीच हा चित्रपट मल्टीप्लेक्सवर दाखवण्यात येईल.