Kanagana Ranauat Cheap Saree: बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाची होते तर कंगना राणावतची. (Kanagana Ranauat) बॉलीवूडमध्ये सतत काहीना काही कॉन्ट्रोव्हर्सी करणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्यावर होणारी चर्चा ही वेगळ्याच एका कारणासाठी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सध्या (Kanagana Ranauat Post) तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (actress kangana ranauat wears cheap price saree shares a photo viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना आपला मुद्दा उघडपणे मांडते. तिला इंडस्ट्रीची पंगा क्वीन (Panga Queen) देखील म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत कंगनाने आपल्या दमदार अभिनयाने बड्या स्टार्सना स्पर्धा दिली होती. मात्र यावेळी कंगनाचे चित्रपटही फ्लॉप झाले आहेत. सध्या तिचं कोणतेही वक्तव्य किंवा तिच्याशी संबंधित कोणताही वाद समोर आलेला नाही तर यंदा कंगना तिच्या फॅशनमुळे जास्त चर्चेत आली आहे. 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


नुकतीच कंगना रणावत एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती साडीत दिसली. कंगनानं यापुर्वीही उत्तमोत्तम साड्या परिधान केल्या आहेत. ती बहुतेकदा पारंपारिक अवतारात दिसते. पण यावेळी कंगनाने जी साडी नेसली ती अगदी साधी होती. तिचे कपडे इतके साधे होते की तिच्या या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


हा व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यानंतर आणि तिच्या कपड्यांची सर्वत्र चर्चा होताना होत आहे. कंगनानं स्वतःहून इन्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या या साध्या साडीची प्राईस रिविल केली आहे. 



आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी टाकली आहे. ज्यामध्ये तिनं एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अतिशय हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये कंगना खूपच गोंडस दिसत असल्याचे त्या फोटोत दिसून येत आहे. तिनं साडी जी किंमत लिहिली आहे ती वाचून नक्कीच तुमच्या डोळ्याचे पारडं फिटेल. पण विशेष बाब म्हणजे तिने या साडीसोबत घेतलेल्या बॅगची किंमत 3.50 लाख रुपये आहे. 


कंगनानं सांगितले की, मी नसलेली साडी फक्त 600 रुपयांची आहे. 'मी ही साडी कोलकाता येथून 600 रुपयांना विकत घेतली आहे आणि त्यातून तिनं देशभक्तीचा एक संदेशही दिला आहे.