अभिनेत्री कंगना राणावत राजकारणात प्रवेश करणार?
बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘मणिकर्णिका’च्या सिनेमाच्या शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे.
मुंबई : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘मणिकर्णिका’च्या सिनेमाच्या शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे.
राजकारणात येण्याचे संकेत
अशातच एका हिंदी वेबसाईटच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना राणावत राजकारण येण्याच्या दृष्टीनेही विचार करत आहे. चर्चा आहे की, कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकदा भेट घेतली आहे. कंगनाच्या समजूतदारपणावर आणि अभिनयाने मोदी हे प्रभावित असल्याचेही बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदी आणि कंगना भेट
दोन वर्षांआधी स्वच्छता अभियानासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. यात कंगना माता लक्ष्मी बनून साफ-सफाई बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करताना दिसली होती. या व्हिडिओच्या निमित्तानेच कंगना पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटली होती. हा व्हिडिओ करणारे लोक सांगतात की, कंगनाला लक्ष्मीचा रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहमतीनेच दिला गेला होता.
कुठून उतरणार मैदानात
सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार कंगना राणावत हिमाचल प्रदेशातून राजकारणात उतरू शकते. कंगना हिमाचल प्रदेशची आहे. येथील मंडीमध्ये ती राहणारी आहे. ती याच क्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते. सूत्रांनी सांगितले की, कंगना आजकाल राजकीय कामकाजाच्या पद्धती आणि वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
हेच कारण आहे की, कंगनाने गेल्या काही वर्षात सिनेमा निवडताना खूप काळजी घेतली आहे. आपली प्रतिमा चांगली रहावी याबाबत ती सजग बघायला मिळाली.