नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या प्रत्येक वक्तव्याची, तिच्या मतमतांतरांची प्रचंड चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपूरबच्या निमित्तानं देशातील शेतकऱ्यांना खास भेट दिली. मोदींनी केलेल्या घोषणेनं साऱ्या देशात आनंदाची लाट उसळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारकडून तीन कृषी कायदे माघे घेण्याची घोषणा पंतप्रधानानंनी शुक्रवारी केली. ज्याचे पडसाद सर्वत्र उमटले. 


विविध क्षेत्रातील मंडळींनी या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री कंगना रानौत हिच्या नावाचाही यात समावेश आहे. 


अतिशय अनपेक्षितपणे पंतप्रधानांनी शुक्रवारी गुरूनानक जयंती प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केलं. 


यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा करत सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. 


पंतप्रधानांच्या या घोषणेमुळं आता दोन गटांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात केली आहे. 


काहींनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे, तर काहींनी मात्र कायदे मागेच घ्यायचे होते, तर ते जाहीर का केले असा सवालही केला. 


ब़ॉलिवूडमध्येही याचे पडसाद उमटले. कंगना रानौतनंही यावर प्रतिक्रिया दिली. (Kangana Ranaut)


कायदे मागे घेण्याचा निर्णय हा अतिशय दु:खद आणि अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 



'संसदेत असणाऱ्यांऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवतील तर, हा देश लवकरच जेहादी बनेल', असं तिनं लिहिलं. 


क्वीन कंगना या मुद्द्यावर आणखी काही बोलते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.