मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानकडे क्रूझवर रेव्ह पार्टीत ड्रग्ज सापडल्याने एनसीबीने त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. या दरम्यान, शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या समर्थनार्थ चित्रपट तारे सतत पुढे आले आहेत. दरम्यान, हृतिक रोशनने आर्यन खानसाठी एक लांब पोस्ट केलीये, काही मिनिटांनंतर कंगना राणावतने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. आर्यनचा बचाव करणाऱ्या सेलिब्रिटींना कंगना राणावतने पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. त्यांना तिने बॉलिवूड माफिया म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनच्या बचावासाठी पुढे आलेल्या चित्रपट कलाकारांसाठी कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने त्या लोकांना लक्ष्य केले आहे जे म्हणतात की, आर्यन खानने कोणतीही चूक केली नाही.


कंगनाने इन्स्टा स्टोरीवर म्हटले आहे, 'आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्याचा गौरव करू नये. मला खात्री आहे की यामुळे त्याला परिणामांची जाणीव होईल. जेव्हा कोणी संवेदनशील परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याबद्दल गप्पा मारणे चांगले नाही, परंतु त्याने काही चुकीचे केले नाही हे समजणे गुन्हा आहे. 



अभिनेता हृतिक रोशनने आर्यनसाठी पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या समर्थनात त्याने ही पोस्ट लिहिली आहे.