कंगना राणौतला डेंग्यूची, तरीही इमर्जेन्सीच्या सेटवर हजर, नक्की काय घडलं?
नुकताच तिने आपल्या `इमर्जेन्सी` या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे.
Kangana Ranaut: सध्या कंगना राणौत ही अभिनेत्री चर्चेत आहे. नुकताच तिने आपल्या 'इमर्जेन्सी' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. सध्या आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यक्त असलेली कंगना मात्र डेंग्यूमुळे आजारी पडली आहे. असं असलं तरी चित्रपटाच्या सेटवर येऊन कंगना आजारी असतानाही काम करता दिसून आली आहे.
कंगना 'इमर्जेन्सी' या चित्रपटातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भुमिका करताना दिसणार आहेत. त्याचसोबतच ती या चित्रपटाची निर्मातीही आहे. कंगनाला डेंग्यू झाल्याची बातमी खुद्द 'मणिकर्णिका फिल्म्स'च्या टीमने माहिती दिल्याचे समोर आले आहे. 'मणिकर्णिका फिल्म्स'च्या टीमने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे कंगनाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात कंगना आजारी असूनही काम करताना दिसत आहे.
ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'जेव्हा तुम्हाला डेंग्यूचा त्रास होतो तेव्हा तुमच्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या झपाट्याने कमी होते आणि खूप तापही येतो. या अवस्थेतही तुम्ही कामावर आलात तर तो वेडेपणा ठरतो, passion नाही. कंगना राणौत ही म्हणूनच आमची प्रेरणा आहे. 'मॅडम. लवकर बरे व्हा.' असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. त्यावर कंगनानेही त्यांचे आभार मानले आहेत.
कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातील त्याचा लूक व्हायरल झाला आहे. कंगनाशिवाय 'इमर्जन्सी'मध्ये श्रेयस तळपदे आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत. श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार असून अनुपम खेर क्रांतिकारी नेते जेपी नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.