मुंबई:सध्याच्या काळात बॉलिवूडपासुन लांब असलेली अभिनेत्री करिश्मा कपूरने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत करिश्मा कपूरने अभिनेता सलमान खान सोबत असलेला फोटो शेअर केला आहे.बॉलिवूडमंडळी नेहमीच सोशल मीडियावर फार ऑक्टिव असतात. करिश्मा कपूरने सलमान सोबत शेअर केलेला फोटो सध्या भलताचं व्हयरल होत आहे. करिश्माने फोटो शेअर करुन Hitchhiking in which film?#guessinggame#flashbackfriend@beingsalmankhan असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि सलमान खान यांनी  हिट सिनेमे दिले आहेत. ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. 'बीबी नंबर 1', 'दुल्हन हम ले जाएंगे', आणि 'हम साथ साथ हैं' सिनेमांच्या माध्यमातून दोघांनी काळ गाजवला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान सध्या 'भारत' सिनेमाच्या शूटिंग  मध्ये व्यस्त आहे. सिनेमात सलमान आणि कटरीना एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी 'भारत' सिनेमाच्या माध्यमातून समोर येणार आहे. 
सिनेमात दिशा पटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2019 मध्ये ईदच्या दिवशी 'भारत' प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीवरुन सिनेमात सलमान 5 वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


नुकताच प्रदर्शित झलेला शाहरुख खानचा सिनेमा 'झिरो' मध्ये दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी आणि करिश्मा कपूर एकत्र दिसल्या होत्या.