मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या रिलेशनशिपच्याच चर्चा आता बॉलिवूडमध्ये कमालीचा धुमाकूळ घालत आहेत. विकीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी कतरिना आणि विकीमधील नातं सर्वांसमोर आलं आणि सर्वांच्याच नजरा वळल्या. (Katrina Kif- Vicky Kaushal Wedding Rumors)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता म्हणे ही जोडी यंदाच्या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी सज्ज झाली आहे. 


हा शेवट गोड करण्यासाठी ही अभिनेत्री आणि 'उरी' फेम अभिनेता थेट विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


इतकंच नव्हे, तर यासाठीची तयारीही त्यांनी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. या जोडीनं अद्यापही नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.



असं असलं, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी त्यांच्या परिनं तयारीला लागले आहेत. 


लग्नाच्या दिवसासाठी कतरिना एक सुरेख नववधू दिसण्याच्या हेतूनं सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीचा ब्रायडल लेहंगा घालणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


इतकंच नव्हे, तर कतरिनाचे लेहंग्यातील काही फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. हे फोटो ती लेहंग्यामध्ये आणि एकंदरच ब्रायडल लूकमध्ये नेमकी कशी दिसते याची पुसटशी कल्पना सर्वांना देत आहेत. 


विकी आणि कतरिना लग्न करणार की नाही, लग्न केल्यास कसा असेल त्यांचा विवाहसोहळा याबाबत चाहत्यांकडून बरीच उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे.