मुंबई : कतरिना कैफला अभिनय विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. हळूहळू कतरिनाने आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशा अनेक अभिनेत्री असतात ज्या लग्नानंतर आपलं करिअर थांबवतात. मात्र तिने कधीही तिचं करिअर थांबवलं नाही. याचबरोबर तिने तिच्या काळातील नंबर वन अभिनेत्रीचंही स्थान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. ती केवळ एक अद्भुत अभिनेत्री आणि डान्सरच नाही तर ती एक बिझनस वुमन देखील आहे. अनेकांना तिचा ब्युटी ब्रँड 'के ब्युटी' खूप आवडतो. अनेकदा अभिनेत्री तिच्या ब्यूटी प्रोडक्ट्सची जाहिरात करताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच कतरिना कैफने तिच्या ब्युटी ब्रँडच्या प्रोडक्ट्सचा आढावा घेतला. तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा पेज 'के ब्यूटी'वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेत्री नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. मात्र तिच्या चाहत्यांना कतरिनाच्या चेहऱ्यावर काही बदल दिसले आणि त्यांनी लगेचच अभिनेत्रीच्या नाकावर शस्त्रक्रिया केलं असल्याचं कमेंट्सद्वारे म्हटलं आहे.  


नेटिझन्सनी तिच्या पोस्टवर कमेंटवर वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहीलंय की, "तुम्ही तुमच्या ओठांना आणि नाकाला काय केलंय? आणि का???" तर दुसर्‍याने म्हटलंय, "तिने तिच्या ओठांवर बोटॉक्स केलं असेल पण माझ्यावर विश्वास ठेवा तिने तिच्या नाकाला काहीही केलं नाही, हे नैसर्गिक आहे आणि प्रामाणिकपणे तिला जगातील सर्वात सुंदर नाक मिळालं आहे." एका नेटिझनने कमेंट केली की, "तिचे ओठ मोठे दिसत आहेत. " युजर्स आपल्या प्रतिक्रीया कमेंट्सच्या माध्यामातून देत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जेव्हा कतरिनाने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तिचं नाव अनेकदा सलमान खानशी जोडलं गेलंय. आणि बरेच लोक तिला त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळखत होते, मात्र यानंतर कतरिनाने आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सलमानला दीर्घकाळ डेट केल्यानंतर ती त्याच्यापासून वेगळी झाली. यानंतर तिच नाव अभिनेता रणबीर कपूरसोबतचं नाव जोडलं गेलं. या सगळ्यानंतर तिच्या आयुष्यात विकी कौशल आला.  काही काळ डेटिंग केल्यानंतर, कतरिना आणि विकीने उदयपूरमध्ये लग्न केलं.