Keerthi Suresh Antony Thathil Wedding : सध्या लग्नसराईचा सीझन सुरु झाला आहे. एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील पाहायला मिळत आहेत. सगळ्यात आधी नागा चैतन्य-शोभिता धूलिपाला हे लग्न बंधनात अडकले आणि त्यानंतर अनुराग कश्यपची लेक लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ एकीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आता दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश ही लग्न बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 12 डिसेंबर रोजी गोव्यात कीर्ती सुरेशनं लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड अ‍ॅन्थनी थॅटिलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. त्याचे फोटो आता समोर आले आहेत. कीर्तीनं तिच्या लग्नाचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्या दोघांनी पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यापैकी एका फोटोत जेव्हा अ‍ॅन्थनीनं कीर्तीना मंगळसूत्र घातलं त्यानंतर तिचे आनंद अश्रू पाहायला मिळाले. त्यानंतरच्या फोटोत कीर्ती ही मंगळसूत्र घातल्यानंतर अ‍ॅन्थनीला मिठी मारून भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 



कीर्ती सुरेश ही पारंपारिक वेषात सुंदर दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी कीर्ती सुरेशला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वरुण धवननं तिच्या पोस्टवर कमेंट करत खूप सुंदर दिसतेस. शुभेच्छा. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियांका मोहननं देखील कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हंसिका मोटवानीनं देखील त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त कमेंट करत नाही तर हंसिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 


हेही वाचा : श्रीदेवीचा तो चित्रपट जो 10 वर्ष रिलीजच झाला नाही; शुटिंगदरम्यान अक्षय कुमारवर चिडली होती अभिनेत्री, 'आधी याला...'


दरम्यान, काही दिवसांपूर्वी कीर्तीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना एक हिंट दिली होती. त्यामुळे तिच्य चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाला घेऊन उत्सुकता प्रचंड वाढली होती. तर कीर्ती आणि अ‍ॅन्थनी हे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तर 27 नोव्हेंबर रोजी कीर्तीनं एक पोस्ट शेअर करत अ‍ॅन्थनीसोबतचं नातं कन्फर्म केलं होतं. ही पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शन दिलं होतं की '15 वर्ष झाली आणि आजही हा प्रवास सुरु आहे... नेहमीच अ‍ॅन्थनी आणि कीर्ती हे सोबत होते.'