'या' देशात आहे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे जगातील एकमेव विमानतळ

Floating Airport  : जाणून घेऊया कोणत्या देशता आहे पाण्यावर तरंगणारे विमानतळ

| Dec 12, 2024, 15:34 PM IST

Japan Built a Floating Airport  Kansai International Airport : समुद्रांच्या लाटांवर जहाज स्वार होतात. जगात एक असा देश आहे जिथे समुद्राच्या  पाण्यावर तरंगणारे विमानतळ उभारण्यात आलेले आहे. समुद्राच्या मध्यभागी उभारण्यात आलेले हे एकमेव विमानळ आहे. जाणून घेऊया विमानतळ कोणत्या देशात आहे. 

 

1/7

समुद्राच्या मधोमध बांधण्यात आलेले विमानतळ पाहून अंचबित व्हाल. या विमानतळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे विमानतळ 24 तास सुरु ठेवता येते.  

2/7

 हे विमानतळ बांधण्यासाठी समुद्रात सी बेड तयार करण्यात आला होता. एवढेच नाही तर या विमानतळाला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याभोवती समुद्र संरक्षण भिंत बांधण्यात आली. 

3/7

 हे विमानतळ जपानमधील ओसाका, क्योटो आणि कोबे सारख्या मोठ्या शहरांना जगाशी जोडते. 

4/7

या विमानतळाची  धावपट्टी 4,000 मीटरपेक्षा जास्त लांब आहे. हे जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे विमानतळ आहे.   

5/7

या विमानतळाचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली.  1994 पासून वाहतुकीसाठी सुरू केले.  

6/7

जपानमध्ये समुद्रावर उभारण्यात आलेल्या या विमानतळाचे नाव कानसाई विमानतळ आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.   

7/7

जपानने (Japan) समुद्राच्या (SEA)मधोमध विमानतळ बांधण्याचा पराक्रम केला.