Ketaki Chitale Post : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असते.  राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे. अमृता फडणवी यांनी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा 'राष्ट्रपिता' म्हणून उल्लेख केला होता. यावर केतकी चितळे चांगलीच भडकली आहे. केतकीने इन्स्टाग्रामवर स्टोरी(instagram story) ठेवत आपली भूमिका मांडली आहे. 


काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले दोन राष्ट्रपिता आहेत आधी महात्मा गांधी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असं विधान अमृता फडणवीस यांनी केले होते. नागपुरातील अभिरूप न्यायालयात त्यांनी हे विधान केले होते. यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोपांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आपण निशब्द आहोत यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलतील असं संजय राऊत म्हणाले.


केतकी चितळेची भूमिका काय?


संजय राऊत यांच्या पाठोपाठ अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंग्रजीमध्ये मजकूर लिहीत केतकीने आपली भूमिका मांडली आहे. सध्या जुने आणि नवीन आदर्श असा वाद सुरू आहे. जुने , नवीन राष्ट्रपिता हा वाद देखील आता जुना झाला आहे. प्रत्येक दिवस नविन आहे. भारत दररोद बदलत आहे. हीच ती वेळ आहे की आपण आता स्वत:ही बदलले पाहिजे. तीनशे वर्षांपूर्वीचा संदर्भ आता 100 वर्षांवर आला आहे. हे  सत्य आपण स्वीकारायला पाहिजे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय... जागो मेरे देश असं म्हणत तिने देशवासीयांना आवाहन केले आहे. या आपल्या स्टोरीच्या माध्यामातून केतकीने एकप्रकारे अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याला चॅलेंज केले आहे. 



केतकी चितळेने महाराजांवरची 'ती' पोस्ट केली होती डिलीट


काही दिवसांपूर्वीच केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होता, तसेच महाराजांच्या मावळ्यावर सडकून टिका करण्यात आली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिने ती डिलीट केली होती. मात्र पोस्ट डिलीट केल्यानंतरही ती चर्चेत आली होती.


 “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश आहे. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच”. “एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे, “चार पैश्यात घोषणा करा. जातीयवाद निर्माण करा. सनातनी हिंदू झोपला आहे, याचा फायदा घ्या. जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका. पण लक्षात असू द्या…झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो”, असं केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले होते.