मुंबई :  अभिनेत्री केतकी माटेगावर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. केतकी ही अशी एक अभिनेत्रीपैकी एक आहे जी कायम चर्चेत असते. केतकीने कोणतीही पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. तर अनेकदा ही अभिनेत्री ट्रोलही होते. नुकताच केतकीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा जिममधील एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे ती बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. अनेक युजर्सने तिच्या व्हिडीओवर अश्लिल कमेंट केल्या आहे. या सगळ्या प्रकारावर अभिनेत्री प्रचंड संतापली आहे. आपला राग व्यक्त करत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की, किती बारिक आहेस गं, अजून लहान मुलींचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतीस, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिसमधील सहकर्मचारी असो कोणीही असो आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना समोर जावं लागतं.  


Dear Trollers, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आह. मी तुमच्या भाषेत skinny, (हाडांचा सापळा) बारिक आहे,हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरिर माझी उत्तम साथ देतं.थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल पण म्हणून unhealthy आहे का? तर अजिबात नाही व्यायाम किंवा gym हा फक्त वजन कमी करायला असतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठिके.


पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत comment करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्ट्सवर ओपनली कमेंट ह्याला स्वातंत्र्या आणि फ्री स्पीच असं नाव देता. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल याचा विचार करा.आणि काही लोकं असेही असतील ज्यांना खरच मेडिकल प्रॉब्लेम असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल, मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय. आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन. आय लव्ह यू... केतकी.



तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिहीलं आहे की, एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, ईथे एवढी अक्कल पाजळण्यापेक्षा कमेंट सेक्शन बंद करून ठेवा instagram ने तसा ऑप्शन दिलेला आहे. तर अजून एकाने लिहीलंय, दुर्लक्ष करत चला अशा कमेंट्सकडे. तुम्ही उत्तम काम करत आहात. तर जून एकाने म्हटलंय, leave them, तू फक्त तुला answerable असली पाहिजेस. तर अजून एकाने म्हटलंय, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना। बारीक झाल की म्हणतात काही खातो की नाही आणि जाड झाला की म्हणतात कीती खातोस. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स अभिनेत्रीच्या पोस्टवर करत आहेत. अनेकांनी तिला सपोर्ट केलाय तर अनेकांनी तिला पुन्हा ट्रोल केलंय.