मुंबईः कियारा अडवाणीने अलीकडे सुशांत सिंग राजपूतबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या नाहीत, ज्या तिच्या चाहत्यांना माहित नाहीत. कियारा अडवाणीच्या या खुलाशानंतर चाहत्यांच्या पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला. या मृत्यूचे दु:ख अजूनही बरेच लोक विसरलेले नाहीत आणि अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिनेही सुशांतबद्दल आपले आठवणी सांगून सुशांतच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भावूक केलं.



सुशांत आणि कियाराने 'M.S. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' एकत्र काम केलं होतं. सिनेमात कियाराने धोनीच्या पत्नीची भूमिका केली होती.


कियारा अडवाणी सध्या तिचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान कियाराला तिचा जुना मित्र आणि सहअभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण झाली.


कियाराने 2016 मध्ये आलेल्या 'M.S. धोनी: द अनटोल्ड स्टोरी'चे  काही अनुभव सांगितले, 'आम्ही औरंगाबादमध्ये आम्ही एका गाण्याचे आणि काही दृश्यांचे शूटिंग करत होतो'



मला आठवतं की, आम्ही रात्री आठच्या सुमारास पॅकअप केलं, दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता आमची फ्लाइट होती. म्हणूनच आम्ही संपूर्ण रात्रभर गप्पा मारल्या.


कियाराने सांगते की,  सुशांत सिंह राजपूत सांगायचा की, तो एक अभियंता होता, प्रिती झिंटासोबत त्याने बॅकअप डान्सर म्हणूनही काम केलं. तसंत धोनी सिनेमा कसा मिळाला या सर्व गोष्टी त्याने सांगितल्या.



त्याच्याकडे नेहमी मोठी पुस्तके असायची, जी तो सतत वाचायचा. तो जीवनाबद्दल, लोकांबद्दल खूप उत्सुक होता. ही सर्व त्याची कहाणी ऐकून कियारा म्हणाली होती की, एक दिवस कोणीतरी तुझ्यावर बायोपिक बनवेल.


कियारा पुढे म्हणाली की, सुशांत त्याच्या कामाबद्दल खूप उत्साही होता. तो फक्त दोन तास झोपायचा आणि सांगायचा की, माणसाला फक्त दोन तासांची झोप गरजेची आहे. एखादी व्यक्ती कितीही झोपली तरी त्याच्या मेंदूला फक्त दोन तास विश्रांतीची गरज आहे. दोन तासांच्या झोपेनंतरही तो दुसऱ्या दिवशी तितकाच फ्रेश दिसत असे.